SL vs WI : श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने, तिसऱ्या सामन्यासह मालिका कोण जिंकणार?
Sri Lanka vs West Indies 3rd T20i : श्रीलंका आणि वेस्ट इंडिजने या 3 सामन्यांच्या मालिकेतील प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात चाहत्यांना मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट टीम श्रीलंका दौऱ्यावर आहे. विंडिज श्रीलंकेविरुद्ध टी20I मालिका खेळत आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. सध्या उभयसंघातील टी 20I मालिका ही 1-1 ने बरोबरीत आहे. तर मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामा हा गुरुवारी 17 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे. अशात दोन्ही संघांचा हा सामना जिंकून मालिकाही खिशात घालण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे. चरिथ असालंका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. तर रोव्हमन पॉवेल याच्याकडे विंडिजच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. सामन्याचं आयोजन हे रणगिरी दाम्बुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
दोन्ही संघ सरस
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आतापर्यंत 17 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. आकड्यांनुसार दोन्ही संघ सरस आहेत. श्रीलंकेने विंडिजच्या तुलनेत फक्त 1 जास्त सामना जिंकला आहे. श्रीलंकेने 9 सामन्यात विजय मिळवला आहे. तर वेस्ट इंडिजने श्रीलंकेला 8 सामन्यात लोळवलं आहे. त्यामुळे दोन्ही संघ तोडीसतोड आहे. मात्र आता तिसरा आणि आणि अंतिम सामना हा मालिकेच्या हिशोबाने निर्णायक आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यासह मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नात कोण यशस्वी ठरतं? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे. वेस्ट इंडिज टीम: रोव्हमन पॉवेल (कॅप्टन), ब्रँडन किंग, एविन लुईस, आंद्रे फ्लेचर (विकेटकीपर), रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, गुडाकेश मोटी, रोमॅरियो शेफर्ड, शमर स्प्रिंगर, अल्झारी जोसेफ, शमर जोसेफ, फॅबियन ऍलन, शाई होप, एलिक अथानाझे आणि टेरेन्स हिंड्स.
श्रीलंका टीम: चारिथ असालंका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, भानुका राजपक्षे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, मथीशा पाथिराना, नुवान थुशारा, दिनुरा चंदोरे, दिनुरा चंदोरे, नुवान वांडरसे, असिथा फर्नांडो, अविष्का फर्नांडो आणि चामिंडू विक्रमसिंघे.