SL vs WI : श्रीलंकेने मालिका जिंकली, पण शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभव
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका श्रीलंकेने 2-1 ने खिशात घातली. शेवटच्या सामन्यात श्रीलंकेला वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याची संधी होती. पण ही संधी काय मिळाली आहे.
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. या मालिकेत श्रीलंकेचा वरचष्मा दिसला. सुरुवातीचे दोन सामने जिंकून मालिका खिशात घातली होती. त्यामुळे तिसरा सामना फक्त औपचारिक होता. तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करून व्हाईट वॉश देण्याची संधी होती. पण तसं झालं नाही शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. श्रीलंकेला पावसाच्या व्यत्ययामुळे 23 षटकांचा सामना करता आला. श्रीलंकने 23 षटकात 3 गडी गमवून 156 धावा केल्या. पण डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजसमोर 195 धावांचं आव्हान देण्यात आलं होतं. वेस्ट इंडिजने 22 षटकात 2 गडी गमवून 195 धावांचं आव्हान गाठलं. यावेळी शेरफेन रुदफॉर्डने नाबाद 50, तर एविन लेव्हिसने 61 चेंडूत नाबाद 102 धावा केल्या.
दरम्यान पहिल्या दोन सामन्यातही पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तिथेही डकवर्थ लुईस नियमानुसार टार्गेट फिक्स करण्यात आलं होतं. वेस्ट इंडिजने पहिल्या सामन्यात 38.4 षटकात 4 गडी गमवून 185 धावा केल्या होत्या. पण डकवर्थ लुईस नियमानुसार 232 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान श्रीलंकेने 31.5 षटकात पूर्ण केलं. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या वाटेला फलंदाजी आली होती. तेव्हा 36 षटकात सर्वबाद 189 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 44 षटकांचा करण्यात आला होता. श्रीलंकेने 38 षटकात दिलेले 190 धावांचं आव्हान आव्हान पूर्ण केलं.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, एविन लुईस, केसी कार्टी, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, ज्वेल अँड्र्यू, रोस्टन चेस, गुडाकेश मोटी, मॅथ्यू फोर्ड, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशानका.