Smat 2023 | विदर्भाच्या Jitesh Sharma चा तडाखा, 18 बॉलमध्ये अर्धशतक ठोकत जिंकवलं
Jitesh Sharma Fifty Smat 2023 Vid vs UTK | टीम इंडियाने ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान विरुद्ध एशियन गेम्समध्ये गोल्ड मेडल जिंकलं. त्या टीममधील जितेश शर्मा याने विदर्भासाठी विजयी खेळी साकारली.
चंडीगड | विदर्भ क्रिकेट टीमने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023 मध्ये जोरदार आणि विजयी सुरुवात केली आहे. विदर्भाने कॅप्टन अथर्व तायडे याच्या नेत उत्तरांखडवर 7 विकेट्सने विजय मिळवला. उत्तराखंडने विजयासाठी दिलेलं 142 धावांचं आव्हान विदर्भाने 3 विकेट्स गमावून 11.2 ओव्हरमध्ये 145 धावा केल्या. टीम इंडियाचा जितेश शर्मा हा विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला. तसेच दुसऱ्या बाजूने शुभम दुबे यानेही जितेशला चांगली साथ दिली. जितेशने नुकत्याच एशियन गेम्स 2023 मध्ये टीम इंडियासाठी गोल्ड मेडल जिंकलं होतं.
जितेश शर्माची तोडू खेळी
विदर्भाला 13 ओव्हरमध्ये 142 धावा करायच्या होत्या. मात्र 142 धावांचा पाठलाग करताना विदर्भाची घसरगुंडी झाली. विदर्भाने 56 धावांवर 3 विकेट्स गमावल्या. कॅप्टन अथर्व तायडे 15, ध्रुव शोरी 9 आणि करुण नायर 16 धावांवर आऊट झाला. त्यामुळे विदर्भ टीम अडचणीत सापडली. मात्र जितेश आणि शुबम या जोडीने विदर्भाला अडचणीतून सावरलं आणि विजयी केलं. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी केली. जितेश आणि शुबम या दोघांनी या दरम्यान दे दणादण फटकेबाजी करत उत्तराखंडच्या गोलंदाजांना ठोकून काढला.
जितेश शर्मा याने सर्वाधिक नाबाद 51 धावा केल्या. जितेशने 18 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 सिक्स ठोकल्या. तर शुबमने 24 बॉलमध्ये 2 फोर आणि 4 सिक्ससह नॉट आऊट 47 रन्स केल्या. तर उत्तराखंडकडून राजन कुमार, अग्रीम तिवारी आणि स्वप्नील सिंह या तिकडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
जितेश शर्मा याचा झंझावात
JITESH SHARMA MASTERCLASS…!!!!
Vidarbha needs 86 runs from just 42 balls then Jitesh smashed 51* runs from just 18 balls including 3 fours & 5 sixes in Syed Mushtaq Ali T20I. pic.twitter.com/3KyLekzMVb
— Johns. (@CricCrazyJohns) October 16, 2023
विदर्भ प्लेईंग ईलेव्हन | अथर्व तायडे (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), करुण नायर, ध्रुव शौरे, सौरभ दुबे, अक्षय कर्णेवार, हर्ष दुबे, दर्शन नलकांडे, ललित एम यादव, शुभम दुबे आणि नयन चव्हाण.
उत्तराखंड प्लेईंग ईलेव्हन | आकाश मधवाल (कॅप्टन), युवराज चौधरी, अवनीश सुधा, आदित्य तरे (विकेटकीपर), कुणाल चंदेला, हिमांशू बिश्त, अखिल रावत, दिक्षांशु नेगी, राजन कुमार, अग्रीम तिवारी, स्वप्नील सिंग आणि रविंद्र नेगी.