SMAT 2024 Semi Final: सेमी फायनलसाठी 4 टीम फिक्स, मुंबईसह कोण कोण?
Syed Mushtaq Ali Trophy 2024 Semi Final Fixtures : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेतील उपांत्य फेरीत मुंबई, मध्यप्रदेश, बडोदा आणि दिल्लीने धडक मारली आहे.
सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये टी 20 सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. टीम इंडियासाठी खेळणारे आणि अनेक युवा अनकॅप्ड खेळाडूंनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 स्पर्धेत धमाका केला. आता या स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी 4 संघ निश्चित झाले आहेत. मुंबई,बडोदा, मध्यप्रदेश आणि दिल्ली या 4 संघांनी सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यामुळे आता या 4 संघांमध्ये ट्रॉफीसाठी चुरस पाहायला मिळणार आहे. सेमी फायनलमध्ये कोणत्या संघाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार? हे जाणून घेऊयात.
उपांत्य पूर्व फेरीत मुंबईने विदर्भावर 6 विकेट्सने विजय मिळवला. दिल्लीने उत्तर प्रदेशवर 19 धावांनी मात केली. बडोदाने बंगलावर 41 धावांनी विजय मिळवला. तर मध्यप्रदेशने सौराष्ट्रवर 6 विकेट्सने शानदार विजय नोंदवला. आता 13 डिसेंबरला उपांत्य फेरीतील दोन्ही सामने होणार आहेत. पहिल्या सामन्यात मुंबई विरुद्ध बडोदा आमनेसामने असणार आहेत. या सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होईल.
तर त्यानंतर दुसऱ्या सामन्यात दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश यांच्यात अंतिम फेरीत पोहण्यासाठी चुरस पाहायला मिळेल. या सामन्याला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. त्यानंतर रविवारी 15 डिसेंबरला महाअंतिम सामना होईल. हे तिन्ही सामने बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्येच खेळवण्यात येणार आहेत.
उपांत्य फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक
- शुक्रवार 13 डिसेंबर, बडोदा विरुद्ध मुंबई, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु
- शुक्रवार 13 डिसेंबर, दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु
- रविवार, 15 डिसेंबर, अंतिम सामना, एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु
4 संघ, 3 सामने आणि 1 ट्रॉफी, कोण होणार विजेता?
Here are the semi-finalists of the Syed Mushtaq Ali Trophy 2024-25 🙌
An action-packed 13th December awaits us ⏰ #SMAT | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/N9jhZKMsXZ
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 11, 2024
मुंबई टीम : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, शार्दुल ठाकूर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), तनुष कोटियन, मोहित अवस्थी, अथर्व अंकोलेकर, शम्स मुलानी, सिद्धेश गोयल, रॉयल गोयल, जयेश लाडके. बिस्ता, साईराज पाटील, आकाश आनंद, अंगकृष्ण रघुवंशी, हिमांशू सिंग आणि एम जुनेद खान.
दिल्ली टीम : आयुष बडोनी (कर्णधार), यश धुल, प्रियांश आर्य, अनुज रावत (यष्टीरक्षक), हिम्मत सिंग, मयंक रावत, हर्ष त्यागी, सुयश शर्मा, इशांत शर्मा, सिमरजीत सिंग, प्रिन्स यादव, वंश बेदी, दिग्वेश राठी, आयुष सिंग, समर्थ सेठ , गगन वत्स , वैभव कंदपाल , सार्थक रंजन , जॉन्टी सिद्धू, प्रिन्स चौधरी, अखिल चौधरी, प्रणव राजुवंशी, ध्रुव कौशिक, आर्यन राणा, मयंक गुसैन आणि हिमांशू चौहान.
बडोदा टीम : कृणाल पंड्या (कर्णधार), शाश्वत रावत, अभिमन्यू सिंग राजपूत, भानू पानिया, शिवालिक शर्मा, हार्दिक पंड्या, विष्णू सोळंकी (विकेटकीपर), अतित शेठ, महेश पिठिया, लुकमान मेरिवाला, आकाश महाराज सिंग, राज लिंबानी, चिंतल गांधी, अश्वत कुमारद्वीप, एन भट्ट, मितेश पटेल, शुभम श्यामसुंदर शर्मा, सोयेब सोपारिया, ज्योत्सनील सिंग आणि लक्षित टोकसिया.
मध्यप्रदेश टीम : रजत पाटीदार (कर्णधार), अर्पित गौड, हर्ष गवळी (विकेटकीपर), सुभ्रांशु सेनापती, व्यंकटेश अय्यर, त्रिपुरेश सिंग, हरप्रीतसिंग भाटिया, राहुल बाथम, कुमार कार्तिकेय, आवेश खान, शिवम शुक्ला, कमल त्रिपाठी, कुलवंत खेजरोलिया, अरनिकेत खान, ए विकास शर्मा, पंकज चोथमल शर्मा आणि अभिषेक पाठक.