Ajinkya Rahane : 4 सिक्स आणि 9 फोर, अजिंक्य रहाणेचा झंझावात, आंध्रविरुद्ध 95 धावांची खेळी

Ajinkya Rahane : मुंबईचा अनुभवी फंलदाज अजिंक्य रहाणे याने आंध्रविरुद्ध 95 धावांची खेळी केली. रहाणेने या खेळीत 4 षटकार आणि 9 चौकार ठोकले.

Ajinkya Rahane : 4 सिक्स आणि 9 फोर, अजिंक्य रहाणेचा झंझावात, आंध्रविरुद्ध 95 धावांची खेळी
Ajinkya Rahane Smat Mumbai
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 8:34 PM

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने सय्यद मुश्ताक अली 2024 स्पर्धेत झंझावाती खेळी केली आहे. अजिंक्य रहाणे याने आंध्रविरुद्ध हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात विस्फोटक खेळी केली. अजिंक्यने आंध्रकडून मिळालेल्या 230 धावांच्या विजयी आव्हानाचा पाठलाग करताना 95 धावांची स्फोटक खेळी केली. रहाणेच्या या खेळीमुळे मुंबईला आंध्रविरुद्ध 3 चेंडू राखून 4 विकेट्सने हा सामना जिंकता आला. मात्र अजिंक्य रहाणे थोडा दुर्देवी ठरला. अजिंक्यचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. मात्र रहाणेच्या याच खेळीमुळे मुंबईचा विजय सोपा झाला, हे मात्र नक्की.

रहाणेची तडाखेदार खेळी

सलामीला आलेल्या अजिंक्य रहाणे याने सुरुवातीपासूनच टॉप गिअरमध्ये बॅटिंग करत चौफेर फटकेबाजी केली. रहाणेने डावातील सातवं षटक पूर्ण होताच अर्धशतक ठोकलं. रहाणेने 23 बॉलमध्ये 217.4 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक केलं. रहाणेच्या टी 20 कारकीर्दीतील हे 46 वं अर्धशतक ठरलं. रहाणेने अर्धशतकानंतर हा झंझावात असाच सुरु ठेवला. रहाणेने 90 धावांचा टप्पा पार केला. त्यामुळे रहाणे आता मुंबईला विजयी करण्यासह नाबाद शतक करुन परतणार असंच वाटत होतं. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं.

रहाणेला शतक पूर्ण करता आलं नाही. रहाणेचं शतक अवघ्या 5 धावांनी हुकलं. मात्र रहाणेने या खेळीसह मुंबईचा विजय निश्चित केला. रहाणेने 54 चेंडूत 175.93 च्या स्ट्राईक रेटने 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या.

केकेआरच्या कॅप्टन्सीसाठी दावा मजबूत

दरम्यान रहाणेला केकेआरने मेगा ऑक्शनमधून आपल्या ताफ्यात घेतलं. रहाणे मेगा ऑक्शनमधील पहिल्या फेरीत अनसोल्ड राहिला. मात्र त्यानंतर केकेआरने अखेरच्या फेरीत त्याला आपल्याकडे घेतलं. त्यानंतर आता रहाणे केकेआरच्या कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहे. रहाणेने या खेळीसह त्याचा दावा आणखी मजबूत केला आहे. रहाणेने आपण फॉर्मेट आणि परिस्थितीनुसार खेळू शकतो, हे त्याने या खेळीतून दाखवून दिलं.

मुंबई प्लेइंग इलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, शार्दुल ठाकूर, तनुष कोटियन आणि मोहित अवस्थी.

आंध्र प्लेइंग इलेव्हन : रिकी भुई (कर्णधार), श्रीकर भरत (यष्टीरक्षक), अश्विन हेब्बर, शेख रशीद, पायला अविनाश, बोधला कुमार, एसडीएनव्ही प्रसाद, केव्ही शशिकांत, कोडावंडला सुधरसन, सत्यनारायण राजू आणि चीपुरापल्ली स्टीफन.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.