टीम इंडिया वूमन्स विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या तिसर्या आणि चुरशीच्या सामन्यात सांगलीकर स्मृती मंधाना हीने इतिहास घडवला आहे. स्मृतीने न्यूझीलंड विरुद्ध 233 धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी केली आहे. स्मृतीने या शतकी खेळीच चौफेर फटकेबाजी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. स्मृतीच्या शतकामुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग अगदी सोपा झाला आहे. तसेच स्मृतीने या शतकासह आपल्या आजी माजी कर्णधारांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
स्मृतीने 82.6 च्या स्ट्राईक रेटने 121 बॉलमध्ये 10 फोरच्या मदतीने शतक पूर्ण केलं. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 8वं शतक ठरलं. स्मृती यासह आजी माजी कर्णधार हरमनप्रीत कौर आणि मिताली राज या दोघांना मागे टाकत टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान शतकं करणारी पहिली महिला भारतीय फलंदाज ठरली आहे. स्मृतीने मिताली आणि हरमनप्रीत या दोघींच्या तुलनेत फार आधी ही कामगिरी करुन दाखवली आहे.
स्मृतीला शतकानंतर टीम इंडियाला विजयी करुन नाबाद परतण्याची संधी होती. मात्र स्मृतीला शतकानंतर एकही धाव करता आली नाही. स्मृती दुसर्या बॉलवर आऊट झाली.
स्मृती मंधाना, 88 सामने आणि 8 शतकं
मिताली राज, 232 सामने आणि 7 शतकं
हरमनप्रीत कौर, 135 सामने आणि 6 शतकं
स्मृती मंधानाचं ऐतिहासिक आणि विक्रमी शतक
📸 💯@mandhana_smriti departs for a fantastic 100(122) as #TeamIndia edge closer to a win 👏
Updates ▶️ https://t.co/B6n070iLqu#INDvNZ | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/8KphaWYTQl
— BCCI Women (@BCCIWomen) October 29, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, राधा यादव, रेणुका ठाकूर सिंग, सायमा ठाकोर आणि प्रिया मिश्रा.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : सोफी डेव्हाईन (कर्णधार), सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, लॉरेन डाउन, ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गझ (विकेटकीपर), हॅना रोवे, ली ताहुहू, ईडन कार्सन आणि फ्रॅन जोनास.