मुंबई : महाराष्ट्रातील मूळची सांगलीकर आणि टीम इंडियाची स्टार खेळाडू स्मृती मंधानाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवलाय. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या महिला लीगमध्ये स्मृतीने वादळी खेळी केली आहे. या अर्धशतकी खेळीसह स्मृतीने आपल्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे. अवघ्या 42 चेडूंचा सामना करत तिने 70 धावा ठोकल्या. यामध्ये तिने चौकारांचा पाऊस पाडला. या खेळीच्या जोरावर स्मृती अशी कामगिरी करणारी जगातील पहिली महिला खेळाडु ठरली आहे.
‘द हंड्रेड’ या लीगमधील सदर्न ब्रेव्ह या संघाकडून खेळताना स्मृतीने वेल्श फायरविरुद्ध या संघावरूद्ध नाबाद 70 धावांची अर्धशतकी खेळी केली. या लीगमध्ये 50 पेक्षा अधिक स्कोर तिने पाचवेळा केला आहे. तिने टीम इंडियाची खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स आणि डॅनिएल वॅट यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्यासोबतच या लीगमध्ये 500 धावांचा टप्पा गाठणारीही ती पहिली खेळाडू ठरलीये. तर याआधी इंग्लंडची खेळाडू नताली साइवर हिने 497 धावा केल्या आहेत.
स्मृती मंधानाने विक्रम रचला असला तरी त्यांच्या संघाचा 4 धावांनी पराभव झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेल्श फायर संघाने 165-3 धावा केल्या होत्या, यामध्ये हेली मॅथ्यूजने 67 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सदर्न ब्रेव्हज संघाला 161-4 धावा करता आल्या. मंधाना आणि वॅट यांनी दमदार सुरूवात केली होती. दोघींनी 96 धावांची सलामी दिली होती, 67 धावा करून वॅट आऊट झाली. त्यानंतर स्मृतीसोबत कोणालाही भागीदारी करता आली नाही.
दरम्यान, ‘द हंड्रेड’ लागमधील हा पहिला सामना आहे की ज्यामध्या तीन महिला खेळाडूंनी 50 पेक्षा जास्त धावा केल्या.
सदर्न ब्रेव्ह वूमन्स प्लेईंग इलेव्हन | अन्या श्रबसोल (कॅप्टन), स्मृती मंधाना, डॅनिएल व्याट, माइया बॉचियर, फ्रेया केम्प, क्लो ट्रायॉन, जॉर्जिया अॅडम्स, मॅटलान ब्राउन, रिआना साउथबी (विकेटकीपर), कालिया मूर आणि मेरी टेलर.
वेल्श फायर वूमन्स प्लेईंग इलेव्हन | टॅमी ब्युमॉन्ट (कॅप्टन), हेली मॅथ्यूज, सारा ब्राइस (विकेटकीपर), जॉर्जिया एल्विस, लॉरा हॅरिस, एमिली विंडसर, फ्रेया डेव्हिस, अॅलेक्स ग्रिफिथ्स, शबनिम इस्माईल, अॅलेक्स हार्टले आणि क्लेअर निकोलस.