19 बॉलमध्ये 90 धावा, Smriti Mandhana ची वादळी खेळी, आयर्लंडची धुलाई, अनेक रेकॉर्ड उद्धवस्त

Smriti Mandhana Milestone : कर्णधार स्मृती मानधना हीने राजकोटमध्ये आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात वादळी शतकी खेळी केली. स्मृतीने या खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

19 बॉलमध्ये 90 धावा, Smriti Mandhana ची वादळी खेळी, आयर्लंडची धुलाई, अनेक रेकॉर्ड उद्धवस्त
Smriti Mandhana ind vs ire 3rd odiImage Credit source: Bcci
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 4:39 PM

स्मृती मानधना ही नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत आयर्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करत आहे. स्मृतीला पहिल्या सामन्यात अर्धशतक करता आलं नाही. स्मृतीने त्याची भरपाई दुसऱ्या सामन्यात केली. स्मृतीने दुसऱ्या सामन्यात 73 धावांची खेळी केली. स्मृतीला शतक करण्याची संधी होती. स्मृतीने तिसर्‍या आणि आणि अंतिम सामन्यात शतकी खेळी करत बॅटिंगसह मालिकेचा शानदार शेवट केला. स्मृतीने या शतकी खेळीसह अनेक विक्रम आपल्या नावावर केले. स्मृतीने काय काय केलं? जाणून घेऊयात.

स्मृतीने आयर्लंडविरुद्ध 70 चेंडूत शतक पूर्ण केलं. स्मृतीच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 10 वं शतक ठरलं. स्मृतीने यासह 10 एकदिवसीय शतकं करणारी पहिली भारतीय आणि एकूण चौथी महिला क्रिकेटपटू ठरली. तसेच स्मृतीने 70 चेंडूत शतक करत नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हीचा वेगवान शतक करण्याचा विक्रम मोडीत काढला. स्मृतीने हरमनप्रीतच्या तुलनेत 17 चेंडूंआधी शतक पूर्ण केलं. स्मृती यासह टीम इंडियाकडून वेगवान शतक करणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली.

वूमन्स वनडेत सर्वाधिक शतकं

मेग लँनिंग : 15 सूजी बेट्स : 13 टॅमी ब्यूमोन्ट : 10 स्मृती मानधना : 10

स्मृतीने प्रतिका रावल हीच्यासह 233 धावांची सलामी भागीदारी केली. स्मृतीने या दरम्यान 135 धावांची खेळी केली. स्मृतीने 168.75 च्या स्ट्राईक रेटने ही खेळी खेळी केली. स्मृतीने या खेळीत 12 चौकार आणि 7 षटकार लगावले. स्मृतीने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 19 बॉलमध्ये 90 रन्स केल्या.

स्मृतीचं 10 वं एकदिवसीय शतक

टीम इंडियासाठी वेगवान शतक

70 बॉल, स्मृती मानधना विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025, 87 बॉल, हरमनप्रीत कौर विरुद्ध दक्षिण आफ्रिका, बंगळुरु, 2024 90 बॉल, हरमनप्रीत कौर विरुद्ध ऑस्ट्रेलिया, डर्बी 2017 90 बॉल, जेमिमाह रॉड्रिग्स विरुद्ध आयर्लंड, राजकोट, 2025,

वूमन्स इंडिया प्लेइंग ईलेव्हन : स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, सायली सातघरे, मिन्नू मणी, तनुजा कंवर आणि तितस साधू.

वूमन्स आयर्लंड प्लेइंग ईलेव्हन : सारा फोर्ब्स, गॅबी लुईस (कर्णधार), कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, फ्रेया सार्जेंट आणि अलाना डालझेल.

कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.