Video : विराट कोहली याच्या संघातील गोलंदाज उलटा चालत असताना अचानक साप आला, मग झालं असं की…

क्रिकेट मैदानात साप येण्याच्या घटना आता वारंवार घडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेकदा असे प्रकार समोर आले आहेत. असा एक प्रकार लंका प्रीमियर लीगमध्ये घडला.

Video : विराट कोहली याच्या संघातील गोलंदाज उलटा चालत असताना अचानक साप आला, मग झालं असं की...
Video : लाईव्ह सामन्यात पुन्हा एकदा सापाची एन्ट्री, गोलंदाजाने पाहता क्षणीच केलं असं...
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 5:19 PM

मुंबई : आयपीएलप्रमाणे इतर देशांमध्येही प्रीमियर लीगचा धुमधडका सुरु आहे. त्यामुळे खेळाडूंना वेगवेगळ्या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळत आहे. सध्या लंका प्रीमियर लीग सुरू आहे. या स्पर्धेत दोन वेळा मैदानात साप घुसल्याची घटना घडली आहे. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणारा इसुरु उडाना सापाला पाहताच घाबरला. सध्या इसुरु उडाना लंका प्रीमियर लीगमध्ये लव्ह कँडी संघाकडून खेळत आहे. या स्पर्धेतील 15 वा सामना जाफना किंग्स आणि लव्ह कँडी यांच्यात सुरु होता. हा सामना सुरु असतानाच सापाने एन्ट्री मारली. जशी कॅमेरामनची नजर बाउंड्रीच्या पार सापावर पडली. तसा कॅमेरामन कॅमेरा सोडून पळून गेला. आता या स्पर्धेतील दुसरा व्हिडीओ समोर आला आहे. यात साप मैदानात फिरत असल्याचं दिसत आहे.

जाफना किंग्स विरुद्धच्या सामन्यात लव्ह कँडी संघाने 8 गडी गमवून 178 धावा केल्या आणि विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं. विजयी आव्हान गाठण्यासाठी जाफना संघ मैदानात उतरला. तव्हे उडाना क्षेत्ररक्षणासाठी आपल्या जागेवर जात होता. पण मागे जात असताना त्याची नजर पायाजवळ आलेल्या सापावर पडली. त्याला पाहाताच उडाना दचकला पळाला.

यानंतर साप बाउंड्री लाईनजवळ दिसला. सापाला पाहताच बाउंड्रीजवळ उभा असलेला कॅमेरामन पळून गेला. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कँडी संघाने दिलेलं आव्हान जाफना संघाला काही गाठता आलं नाही. 6 गडी गमवून 170 धावा करता आल्या. कँडी संघाने 8 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात उडाना याने 4 षटकं टाकून 30 धावा दिल्या आणि एक गडी बाद केला.

लंका प्रीमियर लीगमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी गॉल टायटन्स आणि दांबुला यांच्यात सुरु असलेल्या सामन्यात सापाने एन्ट्री मारली होती.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.