Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Tendulkar : क्या बात है! क्रिकेटमध्येच काय तर सल्ला देण्यातही मास्टरब्लास्टर, काय म्हणाला सचिन त्याच्या मुलाला?

सचिनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर चाहत्यांशी संवाद साधताना अर्जुनला काय सल्ला दिला हे सांगितले.

Sachin Tendulkar : क्या बात है! क्रिकेटमध्येच काय तर सल्ला देण्यातही  मास्टरब्लास्टर, काय म्हणाला सचिन त्याच्या मुलाला?
सचिनचा अर्जुनला मोलाचा सल्ला.Image Credit source: social
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 11:18 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) पंधराव्या सीजनमध्ये माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डेब्यू करणार असं वाटलं पण आता त्याला पुन्हा पदार्पणासाठी वर्षभर वाट पहावी लागणार आहे. दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला आयपीएल 2021 नंतर आयपीएल 2022 मध्ये अर्जुन तेंडुलकरला एकही सामना खेळायला मिळालेला नाही. अर्जुन तेंडुलकर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध नक्कीच खेळेल, असं बोललं जात होतं. कारण, रोहित शर्माने मागच्या सामन्यात नवीन खेळाडूंना आजमावणार असल्याचं बोललं होतं. पण हे होऊ शकलं नाही. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण निश्चित असल्याचं दिसत होतं. पण तसं झालंही नाही. कारण सामना सुरू होण्यापूर्वी अर्जुन तेंडलुकर रनअप मोजत असल्याचं टीव्हीवर दाखवण्यात आलं होतं. तेव्हा अर्जुन हा सामना खेळतोय असं सर्वांना वाटलं. पण, तेव्हीही तो खेळताना दिसला नाही. दरम्यान, नाराज अर्जुनला अनमोल सल्ला सचिनने दिला आहे.

सचिनने अर्जुनला काय सल्ला दिला?

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Asian News International (@ani_trending)

अर्जुनला सचिनचा अनमोल सल्ला

सचिनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर चाहत्यांशी संवाद साधताना अर्जुनला काय सल्ला दिला हे सांगितलं. एका चाहत्यानं सचिनला विचारलं की, मुलगा अर्जुनला या सीझनमध्ये खेळताना बघायचं आहे का? यावर सचिननं उत्तर दिलं की, ‘मी अर्जुनला मेहनत करत राहण्यास सांगितलं आहे. हा यशाचा एकमेव मार्ग आहे. यामुळे त्याला भविष्यात संधी मिळेल. आताचा हंगाम संपला आहे. क्रिकेटबाबत मी अर्जुनला नेहमीच सांगितलं आहे की हा मार्ग कठीण आहे आणि तसाच राहणार आहे. तुला क्रिकेट आवडते म्हणून तू क्रिकेट खेळायला सुरुवात केलीस. त्यामुळे असेच करत राहा. कठोर परिश्रम करत रहा आणि परिणाम येतच राहतील.’ असं सचिननं यावेळी सांगितलं.

‘निवडीचं  काम व्यवस्थापनाचं

सचिन मुंबई इंडियन्सचा मेंटॉरही आहे. अशा परिस्थितीत लोक अनेकदा विचारतात की सचिन असूनही अर्जुनला संधी का मिळत नाही? याबाबत सचिनने सांगितले की, ‘त्याने संघ निवडीत कधीही हस्तक्षेप केला नाही. सचिन म्हणाला, निवडीबद्दल बोलायचं झालं तर मी कधीही निवडीत भाग घेतलेला नाही. मी हे काम संघाच्या व्यवस्थापनावर सोडतो. मी कधीही असं काम करत नाही.’

सलग दुसरा हंगाम

अर्जुनचा मुंबई इंडियन्समधील हा सलग दुसरा हंगाम होता. अर्जुनला 2022 च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं 30 लाखांची बोली अर्जुूनसाठी लावली होती. मुंबई इंडियन्सचा संपूर्ण हंगाम झाल्यानंतरही अर्जुनला संधी मिळाली नाही. अर्जुन हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. आणि खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करण्याची क्षमताही आहे. तरीही त्याला संधी मिळू शकलेली नाही.

महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार
महाराष्ट्राचे भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश होणार.
राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण
राणे -ठाकरेंमध्ये तापलं कोंबडीवड्यांचं राजकारण.
औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर दंगली का घडवल्या?
औरंगजेबाच्या थडग्याला समाधीचा दर्जा द्यायचा होता तर दंगली का घडवल्या?.
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा
अजितदादांनी घेतला सूरज चव्हाणच्या घरच्या कामाचा आढावा.
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं
कल्याण अत्याचार प्रकरण; आरोपीने कारागृहात स्वत:ला संपवलं.
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?
शाह स्नेहभोजनासाठी तटकरेंच्या घरी, 'त्या' 45 मिनिटांत नेमकं काय घडलं?.
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू
अष्टविनायकाच्या दर्शनाला जाताय? नीट कपड्यात जा..कारण आता ड्रेसकोड लागू.
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर
गर्लफ्रेंडला टाकलं बॅगेत अन् आणलं बॉईज हॉस्टेलात, पुढे जे झालं त्यावर.
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले
तटकरेंच्या घरी जेवणाचं आमंत्रण, गोगावले जाणार की नाही? स्पष्ट म्हणाले.
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?
तटकरेंच्या घरी स्नेहभोजन अन् पाहुणचार, शाहांसाठी काय स्पेशल मेन्यू?.