IND vs USA | सोलापूरकर अर्शीन कुलकर्णी याचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत

Arshin Kulkarni Century | सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी याने यूएसए विरुद्ध चौकारासह धमाकेदार शतक पूर्ण केलं आहे.

IND vs USA | सोलापूरकर अर्शीन कुलकर्णी याचं खणखणीत शतक, टीम इंडिया मजबूत स्थितीत
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 5:02 PM

मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 23 व्या सामन्याचं आयोजन हे ब्लूमफॉन्टेन येथील मॅनगाँग ओव्हलमध्ये करण्यात आलं आहे. या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध यूएसए आमनेसामने आहेत. या सामन्यात टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या टीम इंडियाने जोरात सुरुवात केली. टीम इंडियाने आदर्श सिंह याच्या रुपात 46 धावावंर पहिली विकेट गमावली. त्यानंतर मुंबईकर मुशीर खान आणि सोलापूरकर अर्शीन कुलकर्णी या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 155 धावांची भागीदारी केली. या दरम्यान अर्शीन आणि मुशीर या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावली. त्यानंतर मुशीर खान 73 धावांवर आऊट झाला.

मुशीर खाननंतर कॅप्टन उदय सहारन मैदानात आला. मुशीर आऊट झाला तेव्हा अर्शीन शतकाच्या उंबरठ्यावर होता. अर्शीनने सामन्याच्या 41 व्या ओव्हरमध्ये 1 धावेची गरज असताना शानदार चौकार ठोकून खणखणीत शतक झळकावलं. अर्शीनने या शतकासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली. तसेच अर्शीन अंडर 19 वर्ल्ड कप 2024 मध्ये शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याआधी मुशीर खान याने मुशीर खान याने आयर्लंड विरुद्ध शतक ठोकलं होतं.

अर्शीनला शतक पूर्ण करण्यासाठी 110 चेंडूंचा सामना करावा लागला. अर्शीनने या शतकी खेळी दरम्यान 3 गगनचुंबी षटकार आणि 8 चौकार लगावले. अर्शीनने 50 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने 11 चेंडूत पूर्ण केल्या. अर्शीनला शतकानंतर मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र तो 8 धावा केल्यानंतर आऊट झाला. अर्शीनने 118 बॉलमध्ये 108 धावा केल्या. अतींद्र सुब्रमनियन याने आपल्या बॉलिंगवर पार्थ पटेल याच्या हाती अर्शीनला कॅच आऊट केलं.

अर्शीन कुलकर्णी याची शतकी खेळी

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कॅप्टन), आदर्श सिंह, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, प्रियांशु मोलिया, सचिन धस, अरवेल्ली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, नमन तिवारी, राज लिंबानी आणि सौम्य पांडे.

यूएसएस प्लेईंग ईलेव्हन | ऋषी रमेश (कर्णधार), प्रणव चेट्टीपलायम, भाव्या मेहता, सिद्दार्थ कप्पा, उत्कर्ष श्रीवास्तव, मानव नायक, अमोघ अरेपल्ली (विकेटकीपर), पार्थ पटेल, आरिन नाडकर्णी, अतींद्र सुब्रमण्यन आणि आर्य गर्ग.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.