मुंबई : सौरव गांगुल (Sourav Ganguly) किंवा कोणत्याही दिग्गज क्रिकेटपटुंविषयी बातमी असली की सहाजीक ती तातडीनं लोकांपर्यंत पोहचावी, असं बघितलं जातं. मात्र, आज बीसीसीआयचे अध्यक्ष सौवर गांगुली यांच्याविषयीच्या बातमीचं (News) जरा वेगळंच घडलं. बातमी वेगळीच होती आणि माध्यमांनी त्याचा पूर्णपणे वेगळाच अर्थ घेतला. या अशा 40 मिनिटाच्या वादळात भरपूर काही घडलं. सौरव यांंच्या चाहत्यांना तर काहीवेळ प्रश्न पडला, नेमकं काय चाललंय. तर तिकडे राजकारणातही वेगळीच चर्चा रंगली होती. ही बातमी आली आणि एकच गोंधळ उडाला. संध्याकाळी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलेल्या ट्विटमुळे ही खळबळ उडाली. सौरव यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 2022 हे वर्ष माझ्या क्रिकेट प्रवासाचं 30वे वर्ष आहे. आता मला लोकांचे भलं होईल, असं काहीतरी करायचं आहे. यानंतर सौरव यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचं सांगण्यात आलं. मात्र, काही वेळातच बोर्डाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं की सौरव गांगुली यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. सौरव गांगुली 2019 पासून बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. यानंतर एकच गोंधळ सुरु झाला. नेमकं काय घडलं, हे कुणालाही कळेना.
गांगुलींच्या ज्या ट्विटचा राजीनाम्याशी अर्थ जोडला गेला. त्या ट्विटमध्ये गांगुलींनी लिहिले की, माझा क्रिकेट प्रवास 1992 पासून सुरू झाला. त्याला 2022 मध्ये 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रिकेटनं मला खूप काही दिलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुमचा पाठिंबा मिळाला आहे. या प्रवासात ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि आज मी जिथे आहे तिथे पोहोचण्यास मदत केली त्या सर्वांचे मी आभार मानतो. आज मी काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार करत आहे. मला वाटतं माझी ही सुरुवात बर्याच लोकांना मदत करेल. माझ्या आयुष्याच्या या नवीन अध्यायात मी तुमच्या पाठिंब्याची अपेक्षा करतो.’ या ट्विटचा अनेकांनी बीसीसीआयच्या राजीनामा दिला, असा अर्थ घेतला. यानंतर एकच गोंधळ उडाला.
— Sourav Ganguly (@SGanguly99) June 1, 2022
गांगुलीने सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी आगीसारखी पसरली. दरम्यान, गांगुली यांनी राजीनामा दिला नसल्याचं बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सांगितलंय.
Sourav Ganguly has not resigned as the president of BCCI: Jay Shah, BCCI Secretary to ANI pic.twitter.com/C2O3r550aL
— ANI (@ANI) June 1, 2022
तर राजीनाम्याची बातमी पसरल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री आणि बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) हे बीसीसीआयचे अध्यक्ष बनणार असल्याची चर्चा होऊ लागली होती. सौरव गांगुली आणि जय शहा यांची घट्ट मैत्री असून आयपीएलची (IPL 2022) फायनल देखील दोघांनी सोबत बसून पाहिला. मात्र, त्यातही तथ्य नव्हतं.
गांगुली राजकारणात नवी इनिंग सुरू करू शकतात, असाही अर्थ काढला गेला. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या दोन दिवसीय दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांची भेट घेतली होती. ही बैठक सौरव गांगुलीच्या निवासस्थानी झाली. यादरम्यान शाह आणि गांगुली यांनी एकत्र जेवणही केले. त्यामुळे राजकारणातील गांगुलीच्या नव्या इनिंगच्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावेळी पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष डॉ. सुकांता मजुमदार, विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी आणि स्वपन दास गुप्ता यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते. गांगुली यांना अमित शहा यांच्या भेटीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, डिनरचा राजकीय अर्थ काढू नये. त्यावेळी गांगुली म्हणाले होते की, मी अमित शहांना दशकाहून अधिक काळ ओळखतो आणि त्यांना अनेकदा भेटलो आहे. आमच्याकडे खूप काही बोलायचे आहे. मी त्यांना 2008 पासून ओळखतो. मी खेळायचो तेव्हा भेटायचो. मी त्यांच्या मुलासोबत (जय शाह) काम करतो,’ यावरुन त्यावेळी अर्थ काढला गेला होता.