Sourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीने वाढदिवशी केला मुलगी सनासोबत ‘लंडन ठुमकडा’ गाण्यावर डान्स

सौरव गांगुलीचा आज वाढदिवस आहे. क्रीडाप्रेमी आणि चाहत्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात खऱ्या अर्थाने टीम इंडियाला अच्छे दिन आले. त्यामुळे सौरव गांगुलीचा उदो उदो दिग्गज खेळाडू करतात.

Sourav Ganguly Birthday : सौरव गांगुलीने वाढदिवशी केला मुलगी सनासोबत 'लंडन ठुमकडा' गाण्यावर डान्स
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 3:45 PM

दिग्गज माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली याने भारतीय क्रिकेटचा एक काळ गाजवला. त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया खऱ्या अर्थाने बहरली. यापूर्वी भारतीय संघ घरात वाघ आणि परदेशात मांजर अशी स्थिती होती. मात्र ही स्थिती बदलण्यात माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा हात आहे.  एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून टीम इंडियाला मोठ्या उंचीवर नेण्याचे श्रेय सौरव गांगुलीला जाते. सौरव गांगुलीला संघात दादा म्हणून वेगळाच आदर होता. भारताने नुकताच टी20 विश्वचषक जिंकला असून पडद्यामागील श्रेय सौरव गांगुलीकडेही आहे.अध्यक्ष असताना रोहित शर्माला नियमितपणे सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार बनवण्यात आले. तसेच राहुल द्रविडला प्रशिक्षक म्हणून भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारण्यास पटवून दिले.अशा लाडक्या सौरव गांगुलीचा आज म्हणजेच 8 जुलैला वाढदिवस असतो. सौरव गांगुलीने आपला 52वा वाढदिवस साजरा केला. सौरव गांगुली बहुतांश वेळ लंडनमध्ये असतात. यावेळी त्यांनी आपला वाढदिवस लंडनमध्ये साजरा केला. यावेळी सौरव गांगुली वेगळ्याच मूडमध्ये दिसला. मुलगी सनाने त्याला लंडनच्या रस्त्यावर ठेका धरायला लावला. बाप लेकीने लंडन ठुमकदा गाण्यावर डानंस केला. तसेच गांगुलीच्या कुटुंबियांनी मध्यरात्री केक कापून आपला वाढदिवस साजरा केला.

सौरव गांगुलीला बंगालचा राजा म्हणून ओळखलं जातं. तो कोलकात्यात राहतो. त्यांचे घर महालापेक्षा कमी नाही. सौरव गांगुलीने लंडनमध्ये 2 बीएचके फ्लॅट खरेदी केला आहे. त्याची किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. टीम इंडियासाठी जवळपास 11 वर्षे खेळलेला गांगुली देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गांगुली दरवर्षी सुमारे 25 कोटी रुपये कमावतो. त्यांची एकूण संपत्ती 750 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे मर्सिडीज आणि रेंज रोव्हरसारख्या गाड्या आहेत.

सौरव गांगुलीने भारतीय संघासाठी 113 कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने 16 शतके आणि 35 अर्धशतकांसह एकूण 7212 धावा केल्या आहेत. कसोटी सामन्यात त्याची सर्वोच्च धावसंख्या 239 आहे.सौरव गांगुली टीम इंडियासाठी 311 वनडे सामने खेळला आहे. त्यात त्याने 11363 धावा केल्या असून 22 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. सौरव गांगुली आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट खेळला नाही. पण आयपीएलमध्ये त्याने 59 सामने खेळले आणि 1349 धावा केल्या. त्याच्या नावावर 7 अर्धशतके आहेत. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडिया 2003 मध्ये वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचली होती. मात्र ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळंचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले
'मोदी तो गयो...', संजय राऊत यांची भाजपवर जोरदार टीका, नेमक काय म्हणाले.
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
चेंबूरमध्ये मध्यरात्री आग्नितांडव, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू.
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक
भाजपचे राजेंद्र गावित,शरद पवार गटाचे उदयसिंग पाडवी विधानसभेसाठी इच्छूक.
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?
भाजपला झटका, जम्मू-काश्मीर अन् हरियाणात काँग्रेसची सत्ता?.
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'
दादांनी शरद पवारांना डिवचलं, 'ऐकतंच नाही, सत्तरी झाली तरी हट्टीपणा...'.
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.