सौरव गांगुलीचा मोबाईल घरातून गेला चोरीला, आता सतावत आहे अशी भीती

टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या घरी चोरी झाली आहे. घरातून मोबाईल फोन चोरीला गेल्याने गांगुलीच्या पायाखालची जमिन सरकली. गांगुलीने याबाबत अधिकृत माहिती दिली नाही. पण पोलिसांकडे दाद मागितली आहे.

सौरव गांगुलीचा मोबाईल घरातून गेला चोरीला, आता सतावत आहे अशी भीती
फोन चोरीला जाताच सौरव गांगुली घामाघूम, पोलिसांकडे तक्रार दाखल करत केली विनवणी
Follow us
| Updated on: Feb 11, 2024 | 5:21 PM

मुंबई : बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि माजी कर्णधार यांच्या घरातून लाखो रुपये किमतीचा फोन चोरीला गेला आहे. कोलकात्यामधील बेहला येथील घरात चोरी झाली आहे. संबंधित प्रकार पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर उघडकीस आला आहे. गांगुलीने शनिवारी ठाकुरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सौरव गांगुलीला आता फोनपेक्षा मोबाईलमधून खासगी डाटा लीक होण्याची भीती सतावत आहे. तसेच या डेटाचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त केली आहे. जेव्हा चोरीची घटना घडली तेव्हा गांगुली घरात नव्हता. पण त्यांना जेव्हा फोन घरी विसरल्याचं कळलं तेव्हा त्यांनी शोधाशोध सुरु केली. पण फोन काही हाती लागला नाही. त्यानंतर बरीच विचारपूस केल्यानंतरही सुगावा न लागल्याने अखेर पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली. आता पोलीस तपास सुरु असून लवकरच मोबाईल मिळेल अशी अपेक्षा आहे.

सौरव गांगुली याच्या घरी पेंटिंगचं काम सुरु आहे. त्यामुळे पोलिसांची संशयाची सूई आसपास फिरत आहे. तसेच या व्यतिरिक्त घरात कोण आलं आणि गेलं यासाठी सीसीटीव्ही तपासला जात आहे. गांगुलीने शनिवारी ठाकुरपूर पोलीस ठाण्यात पत्र लिहून घरातून मोबाईल चोरीला गेल्याचं सांगितलं आहे. सकाळी 11.30 वाजता शेवटा फोन पाहिला होता. त्यानंतर फोन सापडलेला नाही.

मोबाईल चोरीला जाण्यापेक्षा त्यातील डेटा लीक होण्याची भीती गांगुलीला सतावत आहे. कारण बँकेचे एक्सेस आणि महत्त्वाची माहिती त्यात आहे. हाच मोबाईल नंबर बँक अकाउंटशी लिंक आहे. तसेच दिग्गज व्यक्तींचे मोबाईल नंबर यात सेव्ह आहेत.मोबाईल शोधण्यासोबत डेटा लीक होऊ नये याची भीती सौरव गांगुलीच्या मनात घर करून बसली आहे. माहितीनुसार गांगुलीचा फोन चोरी झाला त्याची किंमत 1 लाख 60 हजार रुपये आहे.

सौरव गांगुली दिल्ली कॅपिटल्स फ्रेंचायसीमध्ये क्रिकेट डायरेक्टर आहे. सौरव गांगुलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धा 2003 च्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. दुसरीकडे, अंडर 19 क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करणं एक तोट्याचा करार आहे. वरिष्ठ संघ वगळता इतर कोणत्याही स्पर्धेला फारसा फायदा होत नाही.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.