IPL 2021 : IPL सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार की नाही?, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

मुंबईतील नियोजित सामने वानखेडे मैदानावरच पार पडतील, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट करत नाहक चर्चेतील हवा काढून घेतली आहे. Sourav Ganguly On IPL 2021 Matches Wankhede Stadium

IPL 2021 : IPL सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार की नाही?, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा खुलासा
सौरव गांगुली
Follow us
| Updated on: Apr 05, 2021 | 11:38 AM

मुंबई : भारतातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम सर्वत्र दिसू लागला आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लादले आहेत. संपूर्ण देशात त्यातही प्रामुख्याने मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगातली सर्वात मोठी टी-20 क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएलवरही त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. आयपीएलची तयारी करत असलेल्या तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. तसंच मुंबईच्या वानखेडे (Wankhede Stadium) मैदानातील 8 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने IPL सामने मुंबईबाहेर जाणार?, अशी चर्चा सुरु होती. मात्र या चर्चांना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav ganguly) पूर्णविराम दिला आहे. (Sourav Ganguly Statement On IPL 2021 Matches Wankhede Stadium Mumbai)

सौरव गांगुलीने काय म्हटलंय?

मुंबईतील नियोजित सामने वानखेडे मैदानावरच पार पडतील, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट करत नाहक चर्चेतील हवा काढून घेतली आहे. बायो बबलमध्ये खेळाडूंवर कोणताही परिणाम होत नाही. अशा वातावरणात खेळाडू खेळावर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे मुंबईत सामने खेळविण्यास तूर्तास तरी कोणताही धोका नाही, असं सौरव गांगुलीने म्हटलं आहे.

महाराष्ट्र सरकारकडून मुंबईत सामने खेळविण्यास परवानगी मिळाली आहे. 10 ते 25 एप्रिलदरम्यान मुंबईत केवळ 10 सामने पार पडणार आहे. आमच्याकडे खूपच सुरक्षित सेट आहे जिथे खेळाडू आणि कर्मचारी पूर्णपणे सुरक्षित आहे, तिथे त्यांना कसलाही धोका नाही, असं गांगुली म्हणाला.

एकूण चार संघ आपला सुरुवातीचा सामना मुंबईत खेळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे सलामीचे सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर पार पडणार आहेत.

बीसीसीआय सुरक्षेसंबंधी आणखी काय पावलं उचलू शकतं…?

1. कोरोना चाचणी दररोज होईल – बीसीसीआय खेळाडूंची कोरोना चाचणी रोज करु शकते. सध्या दर तीन दिवसांनी कोरोना चाचणी घेतली जाते, परंतु सुरक्षेचा स्तर उंचावण्यासाठी बीसीसीआय दररोज चाचण्या घेऊ शकते.

2. ग्राऊंड स्टाफसाठी स्वतंत्र बायो बबल – बीसीसीआयचं कार्यकारी पथक आधीच बायो बबलचा एक भाग आहे. आता ग्राऊंड स्टाफसाठी स्वतंत्र बायो बबल तयार केलं जाईल.

3. विमानतळाची सुरक्षा – कोणत्याही टीमला पहिल्या एका महिन्यात प्रवास करावा लागणार नाही. तथापि, यानंतर, प्रवासादरम्यान खेळाडूंना कोरोनाची लागण होणार नाही याची काळजी बीसीसीआयला घ्यावी लागेल. विमानतळावरही विशेष लक्ष द्यावे लागेल.

(Sourav Ganguly Statement On IPL 2021 Matches Wankhede Stadium Mumbai)

हे ही वाचा :

IPL 2021 : लग्नानंतर बुमराहचं क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन, घातक यॉर्करने दांडी गुल, मुंबईकडून व्हिडीओ शेअर!

IPL 2021 : ‘भल्या भल्यांच्या केल्या बत्त्या गुल…’ मुंबई इंडियन्सच्या या फलंदाजांना रोखायचं कसं?, प्रतिस्पर्धी संघांना टेन्शन!

Video : क्विंटन डिकॉकची चतुर खेळी, ‘त्या’ एका इशाऱ्याने फकरची झुंजार इनिंग संपवली, द्विशतक 7 धावांनी हुकलं!

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.