Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीवर तातडीची शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकणार

या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआय (BCCI President) अध्यक्ष सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. | Sourav Ganguly

Sourav Ganguly Health Update: सौरव गांगुलीवर तातडीची शस्त्रक्रिया, रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकणार
Follow us
| Updated on: Jan 27, 2021 | 10:57 PM

कोलकाता: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याच्यावर गुरुवारी स्टेनटिंगद्वारे उपचार केले जाणार आहेत. डॉ. देवी शेट्टी यांच्या देखरेखीखाली गांगुलीच्या रक्तवाहिन्यांमध्ये स्टेन्ट टाकल्या जातील, असे वुडलँडस रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आले. (Sourav Ganguly to undergo stenting tomorrow)

सौरव गांगुलीच्या छातीत दुखत असल्यामुळे बुधवारी त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याठिकाणी डॉ. सप्तर्षी बसू आणि डॉ. सरोज मोंडल यांनी गांगुलीवर उपचार केले. आता उद्या त्याच्यावर स्टेनटिंग केले जाणार आहे.

काही दिवसापूर्वीच गांगुलीला छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा गांगुलीची एन्जियोप्लास्टी करण्यात आली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर गांगुली घरी परतला होता.

आधी हृदयविकाराचा सौम्य झटका

या महिन्याच्या सुरुवातीलाच बीसीसीआय (BCCI President) अध्यक्ष सौरव गांगुली ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला होता. गांगुली राहत्या घरी वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याला छातीत दुखु लागले होते. यानंतर त्याला ह्रदय विकाराचा सौम्य झटका आला. त्यानंतर गांगुलीला त्वरित वुडलॅंड्स रुग्णालयात (Woodlands Hospital) दाखल केले गेले. गांगुलीवर उपचार करण्यासाठी एकूण 4 डॉक्टरांच्या पथकाची नेमणूक करण्यात आली. गांगुलीवर एन्जियोप्लास्टी करण्यात आली. या शस्त्रक्रियेत ब्लॉकेज काढण्यात आले.

सौरव गांगुलीची क्रिकेट कारकिर्द

सौरव गांगुलीने 113 कसोटी, 311 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. गांगुलीने एकूण 311 सामन्यात 22 शतकांसह 73.71 च्या स्ट्राईक रेटने एकूण 11 हजार 363 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्याने 100 विकेट्सही घेतल्या आहेत. तसेच 113 कसोटींमध्ये त्याने 16 शतकांसह 7 हजार 212 धावा केल्या आहेत. तसेच 32 विकेट्सही त्याने घेतल्या आहेत. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) कार्यभार त्याच्याच देखरेखीखाली सुरु आहे.

इतर बातम्या

सौरव गांगुलीचा हार्ट अटॅक बंगालमध्ये कुणाला राजकीय झटका देणार?

दादाला झटका, कंपनीला फटका, ह्रदयविकाराच्या झटक्यानंतर ऑईल कंपनीची जाहिरात मागे

“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास स्वागत”, गांगुलीसाठी भाजपची फिल्डिंग

(Sourav Ganguly to undergo stenting tomorrow)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.