मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL) सीजन संपल्यानंतर भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका (IND vs SA T 20 Series) होणार आहे. भारताने या मालिकेसाठी अजून संघ जाहीर केलेला नाही. पण दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यासाठी टीम जाहीर केली आहे. टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघाचा कॅप्टन असेल. एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल यांनी टीममध्ये कमबॅक केलं आहे. पण डेवाल्ड ब्रेव्हीसला (Dewald Bravis) दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालेलं नाही. डेवाल्ड ब्रेव्हीसला बेबी एबी म्हणतात. कारण त्याची फलंदाजीची शैली एबी डिविलियर्स सारखी आहे. सध्या डेवाल्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तो एक आक्रमक फलंदाज आहे. वेगाने धावा बनवण्याची त्याची क्षमता आहे. यावर्षीच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या दृष्टीने हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेची 2021 आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेशाची संधी थोडक्यात हुकली होती.
9 ते 19 जून दरम्यान भारतात पाच वेगवेगळ्या ठिकाणी ही पाच सामन्यांची मालिका होणार आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ट्रिस्टन स्टब्बसचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
“ट्रिस्टनने दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टी 20 स्पर्धेत आपल्या खेळाने लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने सात डावात 48.83 च्या सरासरीने 293 धावा केल्या होत्या. 183.12 त्याचा स्ट्राइक रेट होता. यात 23 सिक्स होते. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अ संघाचाही तो भाग होता. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. मुंबई इंडियन्ससाठी त्याचा हा पहिलाच सीजन आहे” अशी माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून देण्यात आली आहे.
PROTEAS SQUAD ANNOUNCEMENT ⚠️
Tristan Stubbs receives his maiden call-up ?
Anrich Nortje is back ?
India, here we come ??Full squad ? https://t.co/uEyuaqKmXf#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/iQUf21zLrB
— Cricket South Africa (@OfficialCSA) May 17, 2022
एनरिच नॉर्खियाने सुद्धा बऱ्याच महिन्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं आहे. डिसेंबर 2021 पासून दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. सध्या तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. 2017 सालच्या इंग्लंड दौऱ्यानंतर वेन पार्नेल दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 संघात पुनरागमन करतोय.
टेंबा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, रीझा हेंड्रीक्स, हीनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी निगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, डे्वयन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शमसी, ट्रिस्ट स्टब्बस, रासी वॅन डर डुसें, मार्को जॅनसेन,