Cricket : 2 संघ, 3 मालिका आणि 8 सामने, SA ची टीम जाहीर, कॅप्टन कोण?

Cricket : निवड समितीने एकूण 3 मालिकांसाठी संघ जाहीर केला आहे. या तिन्ही मालिकांमध्ये 2 वेगवेगळे कर्णधार संघाचं नेतृत्व करणार आहेत. पाहा कुणाला मिळाली संधी?

Cricket : 2 संघ, 3 मालिका आणि 8 सामने, SA ची टीम जाहीर, कॅप्टन कोण?
ind vs sa
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 10:38 PM

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तान विरुद्ध वनडे आणि आयर्लंड विरुद्ध टी 20i-वनडे सीरिज खेळणार आहे. दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची वनडे सीरिज खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 18 सप्टेंबर रोजी होणार आहे. तर आयर्लंड विरुद्ध 2 सामन्यांच्या टी 20i आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिकांचं आयोजन करण्यात आलं आहे. अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजला 27 सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. वनडे आणि टी 20i या दोन्ही मालिकांसाठी वेगवेगळ्या कर्णधारांची नेमणूक करण्यात आली आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेत टेम्बा बावुमा नेतृत्व करणार आहे. तर ट्रिस्टन स्टब्स, नांद्रे बर्गर आणि रीझा हेंड्रीक्स यांना संधी देण्यात आली आहे. आयर्लंड विरुद्ध होणाऱ्या 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेत एडन मार्करम नेतृत्व करणार आहे.टी 20i संघातही नांद्रे बर्गर आणि ट्रिस्टन स्टब्स यांना संधी मिळाली आहे. या खेळाडूंना सातत्याने संधी दिली जात आहे.

अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार, 18 सप्टेंबर, शारजाह

दुसरा सामना, शुक्रवार, 20 सप्टेंबर, शारजाह

तिसरा सामना, रविवार, 22 सप्टेंबर, शारजाह

आयर्लंड विरुद्ध टी 20i सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, शुक्रवार, 27 सप्टेंबर

दुसरा सामना, रविवार, 29 सप्टेंबर

वनडे सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार, 2 ऑक्टोबर

दुसरा सामना,शुक्रवार, 4 ऑक्टोबर

तिसरा सामना, सोमवार, 7 ऑक्टोबर

अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कॅप्टन), ओटनील बार्टमॅन, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, ब्योर्न फोर्टुइन, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, एंडिले फेहलुकवायो, नकाबायोमजी पीटर, एंडिले सिमलेन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, कायल वेरिन आणि लिजाद विलियम्स.

आयर्लंड विरूद्धच्या टी 20i सीरिजसाठी दक्षिण आफिका टीम : एडन मार्कराम (कॅप्टन), ओटनील बार्टमैन, मॅथ्यू ब्रीट्जके, नांद्रे बर्गर, ब्योर्न फोर्टुइन, रीजा हेंड्रिक्स, पैट्रिक क्रुगर, वियान मुल्डर, लुंगी एन्गिडी, नकाबा पीटर, रयान रिकेलटन, एंडिले सिमलेन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स आणि लिजाड विलियम्स.

आयर्लंड विरूद्धच्या वनडे सीरिजसाठी दक्षिण आफिका टीम : टेम्बा बावुमा (कॅप्टन), ओटनील बार्टमैन, नांद्रे बर्गर, टोनी डी जोरजी, ब्योर्न फोर्टुइन, वियान मुल्डर, लुंगी एनगिडी, एंडिले फेहलुकवायो, नकाबा पीटर, रयान रिकेलटन, जेसन स्मिथ, ट्रिस्टन स्टब्स, रासी वन डेर डुसेन, कायल वेरिन, लिजाद विलियम्स.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.