T20 World Cup 2024 साठी टीम जाहीर, गुजरात जायंट्सच्या खेळाडूकडे कॅप्टन्सी
Womens T20i World Cup 2024: वूमन्स टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी सातवा संघ जाहीर करण्यात आला आहे. वूमन्स आयपीएलमध्ये गुजरातसाठी खेळणाऱ्या खेळाडूला कर्णधारपद देण्यात आलं आहे.
आगामी महिला टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. वूमन्स आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळणाऱ्या लॉरा वोल्वार्ड ही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तसेच इतर खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप संघ जाहीर करणारी सातवी टीम ठरली आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या 10 संघांना 5-5 प्रमाणे 2 गटात विभागण्यात आलं आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून बरोबर 1 महिन्याने अर्थात 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील 10 संघांमध्ये एकूण 18 दिवसात 23 सामने होणार आहेत. तर 20 ऑक्टोबरला विश्व विजेता संघ कोण? या प्रश्नाचं उत्तर क्रिकेट चाहत्यांना मिळेल. वर्ल्ड कप स्पर्धेचं आयोजन हे यूएईत करण्यात आलं आहे.
सुने लुस आणि मारिझान कॅप या दोघांना संधी देण्यात आली आहे. तसेच सिनालो जाफ्ता आणि क्लो ट्रायॉन या दोघींचा समावेश करण्यात आला आहे. मारिझान कॅप ही गेल्या काही महिन्यात सातत्याने लीग आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतेय. तसेच ती ऑलराउंडर आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट चाहत्यांना मारिझानकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दक्षिण आफ्रिका बी ग्रुपमध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेसह या ग्रुपमध्ये इंग्लंड, विंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँडचा समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेला साखळी फेरीत या संघांविरुद्ध प्रत्येकी 1 सामना खेळावा लागणार आहे. दक्षिण आफ्रिका वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 4 ऑक्टोबरला विंडिज विरुद्ध खेळणार आहे.
2 गट आणि 10 संघ
ग्रुप ए : टीम इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंका
ग्रुप बी : दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलँड
दरम्यान आतापर्यंत वर्ल्ड कपसाठी 10 पैकी 7 संघ जाहीर करण्यात आले आहेत. या 7 संघांमध्ये इंडिया, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, स्कॉटलँड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. तर बांगलादेश, श्रीलंका आणि न्यूझीलंड अद्याप वेट एन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत.
वूमन्स दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर
Previous edition’s finalists South Africa have named their squad for the ICC Women’s #T20WorldCup 2024 🙌
More ➡ https://t.co/j1JrxRKOwe pic.twitter.com/xoDxhuE7Xf
— ICC (@ICC) September 3, 2024
वूमन्स टी 20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका टीम : लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसेन, मिके डी रिडर, अयांडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, मारिझान कॅप, अयाबोंगा खाका, सुने लुस, नॉनकुलुलेको म्लाबा, सेश्नी नायडू, तुमी सेखुखुने आणि क्लो ट्रायॉन.