SA vs WI: टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेकडून उध्वस्त
South Africa : दक्षिण आफ्रिकने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह टीम इंडियाचा रेकॉर्ड उध्वस्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धची 2 सामन्यांची कसोटी मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. मालिकेतील पहिली मॅच ड्रॉ राहिली. तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना हा 40 धावांनी जिंकला. उभयसंघातील दुसरा सामना हा 3 दिवस चालला. विंडिजला तिसऱ्या दिवशी 263 धावांचा पाठलाग करताना 222 धावांपर्यंतच मजल मारता आली. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह खास रेकॉर्ड केला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाने 21 वर्षांच्या मेहनतीनंतर केलेला विक्रम उध्वस्त केला आहे. त्यामुळे रोहितसेनेला मोठा झटका लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कायम विंडिजवर दबदबा राहिला आहे. या मालिकेतही तसंच पाहायला मिळालं. दक्षिण आफ्रिकेने 1998 पासून ते आतापर्यंत एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. दक्षिण आफ्रिकेची यंदा विंडिज विरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची सलग 10 वी वेळ ठरली आहे. दक्षिण आफ्रिका यासह एका टीम विरुद्ध सलग आणि सर्वाधिक कसोटी मालिका जिंकणारी टीम ठरली. याआधी हा विक्रम टीम इंडियाच्या नावावर होता. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिके विरुद्ध सलग प्रत्येकी 9-9 कसोटी मालिका जिंकल्या होत्या. टीम इंडियाची विंडिज विरुद्धची विजयी घोडदौड कायम आहे. टीम इंडियाने विंडिज विरुद्धची कसोटी मालिका जिंकल्या दक्षिण आफ्रिकेच्या विक्रमाची बरोबरी करेल.
सामन्याचा धावता आढावा
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ऑलआऊट 160 रन्स केल्या. विंडिजला पहिल्या डावात 160 धावांच्या प्रत्त्युतरात 144 धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 16 धावांची आघाडी मिळाली. दक्षिण आफ्रिकेने दुसर्या डावात 246 धावा केल्या. त्यामुळे विंडिजला विजयासाठी 263 धावांचं आव्हान मिळालं. मात्र विंडिजला 222 धावांपर्यंतच मजल मारता आली.
विंडिजकडून टीम इंडियाचा रेकॉर्ड ब्रेक
South Africa have won 10 consecutive Test series vs West Indies, the most by a single team against an opponent 😮https://t.co/Hxx4QWLSHh #WIvSA pic.twitter.com/v3VC8joMDM
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) August 18, 2024
वेस्ट इंडीज प्लेइंग ईलेव्हन : क्रेग ब्रॅथवेट (कॅप्टन), मिकाईल लुईस, केसी कार्टी, ॲलिक अथानाझे, कावेम हॉज, जेसन होल्डर, जोशुआ दा सिल्वा (विकेटकीपर), गुडाकेश मोटी, जोमेल वॉरिकन, शामर जोसेफ आणि जेडेन सील्स.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी झॉर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), विआन मुल्डर, केशव महाराज, डेन पिएड, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.