SA vs AUS : मिलर नाहीतर ‘हा’ खेळाडू योद्धासारखा खेळला, पराभवानंतर टेम्बा बावुमा भावूक!

| Updated on: Nov 17, 2023 | 12:55 AM

SA vs AUS Temba Bavuma : वर्ल्ड कप सेमी फायनल झालेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात कांगारूंनी फायनल गाठली आहे. आफ्रिका परत एकदा सेमी फायनलमधून बाहेर गेली आहे. या सामन्यानंतर बोलताना टेम्बा बावुमाने आपली प्रतिक्रिया देताना एका खेळाडूचं खास कौतुक केलं आहे.

SA vs AUS : मिलर नाहीतर हा खेळाडू योद्धासारखा खेळला, पराभवानंतर टेम्बा बावुमा भावूक!
Follow us on

मुंबई : वर्ल्ड कप 2023 सेमी फायनल सामन्यामध्ये परत एकदा आफ्रिका संघाचा पराभव झाला आहे. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 212 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाने 48 व्या ओव्हरमध्ये विजयश्री मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाने 3 विकेटने पराभव करत फायनलमध्ये एन्ट्री मारली. ऑस्ट्रेलियाला आफ्रिका संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना घाम फोडला होता, मात्र जिंकण्यासाठी कमी धावा आणि जास्त चेंडू असल्याने कमिन्स आणि स्टार्क यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं. सामना संपल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने आपली प्रतिक्रिया देताना एक खेळाडू शेवटपर्यंत योद्ध्यासारखा खेळत असल्याचं म्हटलं आहे.

काय म्हणाला टेम्बा बावुमा?

ऑस्ट्रेलिया संघाचं अभिनंदन आणि त्यांना फायनलसाठी शुभेच्छा, आज ऑस्ट्रेलिया संघाने खरोखरच शानदार खेळ केला. आम्ही ज्या पद्धतीने सुरूवात केली होती खरा तिथेच आम्ही सामना गमावला होता. सुरूवातील विकेट घेत त्यांनी आमच्यावर दवाब आणला होता. 24 वर 4 विकेट होत्या तेव्हा क्लासेन आणि मिलर यांनी डाव सावरला होता मात्र दुर्दैवाने क्लासेन आऊट झाला. मिलरने शानदार खेळी केली, दबाव असताना सेमी फायनलमध्ये त्याने चिवट फलंदाजी केल्याचं बावुमा म्हणाला.

महाराज आणि मार्करम यांनी बऱ्यापौकी दवाब टाकला होता, कोएत्झी खरोखरच आमच्यासाठी योद्धा ठरला. त्याला क्रॅम्प येत असताना त्याने बॉलिंग केली. राउंड द विकेट येत स्मिथची विकेट घेणे हे अविश्वसनीय होतं. क्विंटन डिकॉकला शेवट वेगळ्या पद्धतीने करायचा होता मात्र आफ्रिका क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूंमध्ये त्याचा समावेश झाल्याचं टेम्बा बावुमाने म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (डब्ल्यू), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेझलवूड

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.