IND vs SA | दुसऱ्या कसोटीआधी टीमला मोठा धक्का, स्टार खेळाडू झाला बाहेर

Ind vs Sa 2nd Test | टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील दुसऱ्या कसोटीआधी स्टार खेळाडू बाहेर झाला आहे. टीम इंडियासाठी दुसरा सामना जिंकणं महत्त्वाचं असून त्याआधी याबाबत क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.

IND vs SA | दुसऱ्या कसोटीआधी टीमला मोठा धक्का, स्टार खेळाडू झाला बाहेर
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 3:58 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला होता. या सामन्यात साऊथ आफ्रिका संघाने एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला. दोन सामन्यांच्या मालिकेमध्ये टीम इंडिया 1-0 ने पिछाडीवर आहे. दुसरा सामना टीम इंडियाला जिंकावाच लागणार आहे. नाहीतर मालिका यजमान आफ्रिका संघ खिशात घालेल. येत्या नवीन वर्षात 3 जानेवारीपासून दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. या सामन्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.

स्टार खेळाडू कसोटीला मुकणार

दुसऱ्या कसोटी सामन्यात साऊथ आफ्रिका संघाचा स्टार बॉलर जेराल्ड कोएत्झी बाहेर झाला आहे.  पहिल्या कसोटीदरम्यान गोलंदाजी करताना त्याला दुखापत झाली होती. या सामन्यात त्याने काही खास कामगिरी केली नाही. अवघी एक विकेट घेण्यात त्याला यश मिळालं. दोन्ही डावात मिळून त्याने 21 ओव्हर टाकल्या 99 धावा दिल्या. मोहम्मद सिराज याची विकेट त्याने घेतली होती.

वर्ल्ड कपमध्ये साऊथ आफ्रिकेकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या जेराल्ड कोएत्झी याची कसोटी संघात निवड झाली होती. जेराल्डच्या जाण्याने त्याच्या जागी संघात आफ्रिका कोणाला संधी देतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केशव महाराज हा चांगला पर्याय उपलब्ध आहे त्यासोबतच वेगवान गोलंदाजांमध्ये मुल्डर आणि लुंगी एनगीडी यांचा समावेश आहे.

दरम्यान, दुसरा कसोटी सामना 3 जानेवारीला सुरू होणार आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये बदल दिसण्याची शक्यता आहे. आफ्रिका टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी आपली सर्व ताकद लावताना दिसेल.

साऊथ आफ्रिका कसोटी संघ -:

दक्षिण आफ्रिका संघ: डीन एल्गर, एडन मार्करम टेम्बा बावुमा (C),, टोनी डी झोर्झी, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (WK), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, विआन मुल्डर, नांद्रे बर्गर, ट्रिस्टन स्टब्स

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.