SA vs AUS : सेमी फायनलमध्ये पराभवानंतर आफ्रिकेला मोठा धक्का, या स्टार खेळाडूची निवृत्ती

SA vs AUS : वर्ल्ड कपमधील सेमी फायनलध्ये झालेल्या सामन्यामध्ये कांगारूंनी विजय मिळवत फायनलमध्ये धडक घेतली आहे. मात्र आफ्रिका संघाला पराभावसह आणखी एक धक्का बसला असून स्टार खेळाडूचा हा शेवटचा सामना ठरला.

SA vs AUS : सेमी फायनलमध्ये पराभवानंतर आफ्रिकेला मोठा धक्का, या स्टार खेळाडूची निवृत्ती
Follow us
| Updated on: Nov 17, 2023 | 1:31 AM

कोलकाता :  वर्ल्ड कप 2023 सेमी फायनल सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांना भिडले. या सामन्यामध्ये कांगारूंनी आफ्रिकेला नमवत फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.  टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिका 212 धावांवर ऑल आऊट झाली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना कांगारूंनी 3 गडी राखत विजय मिळवला. सेमी फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेवर तीन विकेटने मात केली आहे. दक्षिण आफ्रिका संघ परत एकदा सेमी फायनलमध्ये पराभूत झाला आणि चोकर्सचा डाग पुसण्यात अयशस्वी ठरला. सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर आफ्रिकेचा स्टार खेळाडू निवृत्त झाला आहे.

कोण आहे तो खेळाडू?

सेमी फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर आजचा सामना या खेळाडूसाठी शेवटचा होता. वर्ल्ड कप सुरू होण्याआधीच या खेळाडूने आपल्या निवृत्तीबाबत घोषणा केली होती. मात्र अखेरचा सामना सेमी फायलन असेल असा त्याने कदाचित विचार केला नसावा. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून क्विंटन डि कॉक आहे. आफ्रिकेसाठी यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये डि कॉकने दमदार खेळ केला होता.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये  सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. डिकॉक याने 10 सामन्याात 594 धावा केल्या आहेत. आफ्रिका संघाकडून सर्वाधिक करणारा खेळाडू ठरला आहे. यामध्ये त्याने 4 शतके केली होतीत.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

दक्षिण आफ्रिकेचा वर्ल्ड कप साठी संघ जाहीर झाल्यावर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती. डिकॉकने कसोटी क्रिकेटमधून याआधीत निवृत्ती जाहीर केलेली आहे.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (डब्ल्यू), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा, जोश हेझलवूड

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.