टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संघाची पहिल्यांदाच धडक, जाणून घ्या सविस्तर

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडणार आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संघाची पहिल्यांदाच वर्णी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या 8 पर्वात असंच कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये कुतूहूल निर्माण झालं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत या संघाची पहिल्यांदाच धडक, जाणून घ्या सविस्तर
Follow us
| Updated on: Jun 25, 2024 | 1:37 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धा 2024 स्पर्धेत मोठे उलटफेर पाहायला मिळाले. साखळी फेरीत अमेरिकेने पाकिस्तानला बाहेर केलं. तर सुपर 8 फेरीत अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा मार्ग रोखला. कधी नव्हे ती मोठी उलथापालथ या स्पर्धेत क्रीडाप्रेमींना अनुभवता आली. आता उपांत्य फेरीसाठी चार संघ निश्चित झाले आहेत. भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघांनी उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीचे सामने 27 जूनला होणार आहेत. त्यातून दोन संघ अंतिम फेरी गाठणार आहेत. मात्र पहिल्यांदाच एक संघ अंतिम फेरीची पायरी चढणार आहे. उपांत्य फेरीचे सामने होण्यापूर्वीच हे निश्चित झालं आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. तुम्ही म्हणाल की, अजून उपांत्य फेरीचे सामने झाले नाहीत आणि आधीच कसं काय अंतिम फेरीत संघ पोहोचला. तर त्याचं गणित तुम्हाला मागच्या 8 पर्वाचा इतिहास पाहिला तर कळून येईल.

2007 साली टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं पहिलं पर्व पार पडलं. हा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला आणि भारताने विजय मिळवला. 2009 च्या पर्वात पाकिस्तान आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले आणि पाकिस्तानने विजय मिळवला. 2010 च्या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंड ऑस्ट्रेलिया यांच्यात आमनासामना झाला आणि इंग्लंडने बाजी मारली. 2012 च्या वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजने श्रीलंकेला पराभूत केलं आणि जेतपद मिळवलं. 2014 मध्ये श्रीलंकेने भारताला लोळवत जेतेपदावर नाव कोरलं. 2016 मध्ये पुन्हा एकदा वेस्ट इंडिजला जेतपदाचा मान मिळाला आणि इंग्लंडला पराभूत केलं. 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड सामना झाला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच जेतेपदावर नाव कोरलं. मागच्या पर्वात इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद मिळवलं होते.

यंदाच्या पर्वात उपांत्य फेरीचे सामने असे आहेत की, एक नवखा संघ अंतिम फेरी गाठणार आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान अशी लढत होणार आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिका जिंको किंवा अफगाणिस्तान..यापैकी एक नवा संघ अंतिम फेरी गाठणार हे निश्चित आहे. त्यामुळे यंदा जेतेपदासाठी एका नव्या संघाची अंतिम फेरीत धडक असणार आहे. त्यामुळे आता अंतिम फेरी दक्षिण अफ्रिका गाठते की अफगाणिस्तान याची उत्सुकता लागून आहे.  दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे.  अंतिम फेरीचा सामना 29 जूनला होणार आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.