Sri Lanka tour of South Africa | श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, नव्या चेहऱ्यांना संधी

क्विटंन डी कॉक या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व करणार आहे.

Sri Lanka tour of South Africa | श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा,  नव्या चेहऱ्यांना संधी
Follow us
| Updated on: Dec 11, 2020 | 6:12 PM

केपटाऊन : श्रीलंका क्रिकेट टीम दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (Sri Lanka tour of South Africa) येणार आहे. या दौऱ्यात श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 2 सामन्यांची कसोटी मालिका (Test Series) खेळण्यात येणार आहे. या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. South Africa squad announced for Test series against Sri Lanka

दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेसाठी 3 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सलामीवीर सरेल इरवी, विकेटकीपर काईल वेरेन आणि मध्यमगती गोलंदाज ग्लेंटन स्टरमॅन या तिघांना संधी देण्यात आली आहे. तसेच दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला आणि प्रटोरियस बाहेर ठेवण्यात आलं आहे. रबाडाला ग्रोईन आणि हॅमस्ट्रिंग दुखापतीचा त्रास आहे. यामुळे त्याला या कसोटी मालिकेतून वगळण्यात आलं आहे. या दोघांनाही इंग्लंडविरोधातील निर्धारित षटकांच्या सामन्यांमध्ये दुखापत झाली होती.

कर्णधारपदाची धुरा क्विंटन डी कॉककडे

श्रीलंकाविरोधातील कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी क्विंटन डी कॉकला (Quinton de Kock )देण्यात आली आहे.  क्विंटनला कसोटी कर्णधार बनवण्याचा निर्णयावर शुक्रवारी शिक्कामोर्तब करण्यात आला. क्विटंनला 2020-21 या मोसमासाठी कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

आफ्रिका क्रिकेट संघाचा अध्यक्ष ग्रेम स्मिथ याचा काही महिन्यांपूर्वी क्विंटला कसोटी कर्णधार करण्याला विरोध होता. युवा खेळाडूला कर्णधारपद देण्याचा मानस ग्रेम स्मिथचा होता. मात्र केवळ 2 सामन्यांची कसोटी मालिका असल्याने क्विंटनलाच नेतृत्वाची जबाबदारी देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला. क्विंटन याआधी अफ्रिकेचं एकदिवसीय आणि टी 20 सामन्यात नेतृत्व करत होता.

आफ्रिकेचा संघ 2020-21 या मोसमात एकूण 7 कसोटी सामने खेळणार आहे. यामध्ये प्रत्येकी 2 सामने हे श्रीलंका आणि पाकिस्ताविरोधात खेळण्यात येणार आहेत. तर उर्वरित 3 सामने हे ऑस्ट्रेलियाविरोधात खेळले जाणार आहेत.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 26-30 डिसेंबर, सेंच्युरियन

दुसरी कसोटी, 3-7 जानेवारी 2020, जोहान्सबर्ग

कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ : क्विंटन डी कॉक (कर्णधार), टेंबा बावमा, एडेन मारक्रम, फॅफ डु प्लेसी, हेंड्रिक्स, वॅन डॅर डॅसेन, सरेल इरवी, एनरिच नॉर्खिया, ग्लेंटन स्टरमॅन, वियान मुल्डर, किगान पीटरसन आणि काइल वेरेन

संबंधित बातम्या :

SA Vs Pak : दक्षिण आफ्रिका 14 वर्षानंतर जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, जाणून घ्या, कसं असेल शेड्यूल?

South Africa squad announced for Test series against Sri Lanka

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.