Test Cricket : ऑस्ट्रेलियाला 24 तासांतच झटका, मोठी उलथापालथ, नक्की काय झालं?
World test Championship Points Table : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला सलग दुसऱ्या सामन्यात लोळवलं. या सामन्याच्या निकालामुळे मोठी उलथापालथ झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसऱ्या कसोटीती सामन्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने या विजयासह पर्थमधील पराभवाचा वचपा घेतला. ऑस्ट्रेलिया या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप पॉइंट्स टेबलमध्ये टीम इंडियाला मागे टाकत नंबर 1 ठरली. मात्र अवघ्या काही तासांमध्येच कांगारुंच्या आनंदावर विरझन पडलं आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसर्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा 109 धावांनी धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह श्रीलंकेला 2-0 ने व्हाईटवॉश केला. तर तिथे ऑस्ट्रेलियाला मोठा झटका लागलाय.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या निकालाआधी ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी होती. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि टीम इंडिया तिसऱ्या स्थानी होती. मात्र दक्षिण आफ्रिकेने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. तर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. टीम इंडिया आहे त्याच तिसऱ्या स्थानी आहे.
दक्षिण आफ्रिकेचा या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा मार्ग आणखी मोकळा झाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया आणि टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. टीम इंडियाला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत स्वत:च्या जोरावर पोहचायचं असेल तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. सध्या ही 5 सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. तर टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 4-1 ने मालिका जिंकायची आहे. अशात आता टीम इंडियाची चांगली ‘कसोटी’ पाहायला मिळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेची पहिल्या स्थानी झेप
WTC POINTS TABLE:
1) South Africa – 63.33%
2) Australia – 60.71%
3) India – 57.29%
It’s getting closer & closer – we are going to have an epic finish 🤯 pic.twitter.com/XrODDIXMKa
— Johns. (@CricCrazyJohns) December 9, 2024
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा आणि डेन पॅटरसन.
श्रीलंका प्लेइंग इलेव्हन : धनंजया डी सिल्वा (कर्णधार), दिमुथ करुणारत्ने, पथुम निसांका, दिनेश चंडिमल, अँजेलो मॅथ्यूज, कामिंदू मेंडिस, कुसल मेंडिस (विकेटकीपर), प्रभात जयसूर्या, विश्व फर्नांडो, असिथा फर्नांडो आणि लाहिरू कुमार.