कसोटी मालिका खेळण्याचा प्रशिक्षक-कर्णधाराच्या मागणीला द. आफ्रिकन खेळाडूंकडून केराची टोपली, IPL ला प्राधान्य

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला (South Africa Cricket Team) 18 मार्चपासून मायदेशात बांगलादेशविरुद्ध (Bangladesh Cricket Team) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आपला कमकुवत संघ उतरवू शकतो.

कसोटी मालिका खेळण्याचा प्रशिक्षक-कर्णधाराच्या मागणीला द. आफ्रिकन खेळाडूंकडून केराची टोपली, IPL ला प्राधान्य
Kagiso Rabada - Lungi Ngidi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 8:06 AM

मुंबई : दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाला (South Africa Cricket Team) 18 मार्चपासून मायदेशात बांगलादेशविरुद्ध (Bangladesh Cricket Team) दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका आपला कमकुवत संघ उतरवू शकतो. याचे कारण म्हणजे आयपीएल-2022 (IPL 2022). संघातील बहुतेक कसोटी खेळाडू वेगवेगळ्या आयपीएल फ्रँचायझींचा भाग आहेत आणि या प्रसिद्ध भारतीय लीगचा पुढील हंगाम 26 मार्चपासून सुरू होत आहे. ईएसपीएनक्रिकइन्फो या वेबसाइटने अहवालात लिहिले आहे की, कसोटी खेळाडूंऐवजी आयपीएलला महत्त्व देण्याचा सर्वांचा एकमताने निर्णय झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी संघाचा कर्णधार डीन एल्गरने काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू राष्ट्रीय संघासाठी खेळायचे की आयपीएलला पसंती देतात, ही त्यांच्या निष्ठेची चाचणी असेल. CSA ने आपल्या खेळाडूंना IPL मध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे आणि यावेळी त्यांनी इतर सामने देखील आयोजित केलेले नाहीत. यावेळी आयपीएल अजून विस्तृत रुपात पाहायला मिळणार आहे कारण यावेळी स्पर्धेत आठ ऐवजी 10 संघ भाग घेणार आहेत.

बीसीसीआयशी चर्चा

वेबसाइटने आपल्या वृत्तात सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, “बीसीसीआयसोबत झालेल्या करारानुसार आम्ही आमच्या खेळाडूंना आयपीएलसाठी सोडू, परंतु आयपीएलची खिडकी वाढली आहे आणि आमचा करार तसाच आहे.”

दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल खेळण्यास भारतात आले तर द. आफ्रिकेचा संघ बांगलादेशविरुद्ध फ्रंटलाइन अटॅक करणार नाही. कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी हे अनुक्रमे पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सचा भाग आहेत. त्याचवेळी मार्को यान्सन यावेळी सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार आहे. एनरिक नॉर्खिया ​​दुखापतग्रस्त असून त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी तो उपलब्ध नसेल. तसेच त्याच्या आयपीएलमध्ये खेळण्यावरही साशंकता आहे.

प्रशिक्षकाशी बातचित

अहवालानुसार, संघातील सर्व कसोटी तज्ज्ञांची प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्याशी बैठक झाली असून, खेळाडूंना कसोटीला प्राधान्य देण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

इतर बातम्या

आयपीएलमध्ये कोणीच घेतलं नाही, हनुमा विहारीसह 7 भारतीय खेळाडूंनी धरली बांगलादेशची वाट

IPL 2022: आयपीएल खेळण्याआधी 10 षटक टाकून दाखवं, BCCI, NCA कडून हार्दिक पंड्याला चॅलेंज

IPL 2022: खबरदार! बायो बबल मोडल्यास बंदीपासून ते कोट्यवधीचा दंड, वाचा BCCI चे अद्दल घडवणारे नियम

माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.