SA vs AUS Toss : दक्षिण आफ्रिकेने जिंकला टॉस, संघात दोन मोठे बदल
IND vs SA Toss : वर्ल्ड कपमध्ये भारत-न्यूझीलंडनंतर आता दुसरा सेमी फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रिलया यांच्यात पार पडणार आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो संघ फायनलचं तिकीट पक्क करणार आहे.
मुंबई : वर्ल्ड कप 2023 मधील दुसरा सेमी फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडणार आहे. या सामन्यामध्ये टॉस जिंकत दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने संघात दोन मोठे बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिका संघात शम्सीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं आहे. कांगारूंंच्या संघात दोन बदल म्हणजेर मिचेल स्टार्क आणि मॅक्सवेल संघात परतले आहेत.
दक्षिण आफ्रिका संघाने कांगारूंविरूद्ध कायम प्रभावी ठरणाऱ्या शम्सी याला संघात घेतलं. त्यासोबतच केशव महाराजही सध्या चांगली बॉलिंग करत आहे. दोघेही आजच्या सामन्यात कांगारूंसमोर अडचणी निर्माण करू शकतात. ऑस्ट्रेलियानेही आजच्या नॉक आऊट सामन्यामध्ये स्टॉयनिस आणि शॉन अबॉट यांना बाहेर केलं आहे. दोघांच्या जागी स्टार्क आणि मॅक्सवेल यांना संघात घेतलं आहे.
मार्नस लाबुशेन की स्टॉयनिस यांंच्यामध्ये एका कोणाची निवड करताना लाबुशेन याची निवड करताना लाबुशेनला पसंती दिली. रिकी पॉन्टिंगनेही सेमी फायनल सामन्यात लाबुशेनला संघात ठेवण्याचा सल्ला दिला होता. कमिन्सने हा निर्णय घेत स्टॉयनिससारख्या ऑल राऊंडर खेळाडूला बाहेर ठेवलं आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (W), टेम्बा बावुमा (C), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, तबरेझ शम्सी
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड