SA vs IND 2nd T20 | टीम इंडियाच्या रिंकू सिंहने जिगरबाज खेळी केल्यावर ऑन कॅमेरा मागितली माफी, नेमकी कशासाठी?
Rinku Singh Say Sorry after Match : टीम इंडियाचा छोटा युवराज म्हणून रिंकू सिंह याला ओळखलं जावू लागलं आहे. आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात तर पठ्ठ्याने दमदार अर्धशतकी खेळी करत सर्वांनात आपली ताकद दाखवून दिली. मात्र सामन्यानंतर रिंकूचा सॉरी बोलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
मुंबई : साऊथ आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेटने साऊथ आफ्रिका संघावर विजय मिळवला. पावसाने बॅटींग करण्याआधी रिंकू सिंग याने केलेल्या जिगरबाज खेळीची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. पठ्ठ्याने आपल्या करियरमधील पहिलं अर्धशतक केलं मात्र संघाला विजय मिळवता आला नाही. या सामन्यात रिंकू शेवटच्या ओव्हरपर्यंत नाबाद राहिला होता. रिंकूचं सर्वत्र जोरदार कौतुक होत असलेलं पाहायला मिळत आहे. अशातच त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो त्यामध्ये सॉरी बोलत आहे.
रिंकू कशासाठी बोलला सॉरी?
विकेट अवघड होतं, त्यावेळी सूर्यकुमार यादव म्हणाला घाबरू नकोस तुझा नैसर्गिक खेळ कर. सूर्याच्या या सल्ल्याचा मला फायदा झाला. विकेटचा अंदाज घेतल्यावर मी एकदा सेट झालो त्यानंतर मी माझ्या पद्धतीने खेळ केला. मी मारलेल्या सिक्सने काच फुटली याबाबत मला काही कल्पना नव्हती. आता तुमच्याकडूनच कळत आहे पण त्यासाठी सॉरी, असं रिंकू सिंग म्हणाला.
Maiden international FIFTY 👌 Chat with captain @surya_14kumar 💬 … and that glass-breaking SIX 😉@rinkusingh235 sums up his thoughts post the 2⃣nd #SAvIND T20I 🎥🔽 #TeamIndia pic.twitter.com/Ee8GY7eObW
— BCCI (@BCCI) December 13, 2023
रिंकू सिंगने मंगळवारी झालेल्या सामन्यात सूर्यासोबत महत्त्वाची भागीदारी केली. कारण टीम इंडियाच्या 55-3 विकेट गेल्या होत्या त्यावेळी रिंकू मैदानात आला होता. रिंकूसोबत सूर्या होता, सूर्याने रिंकूला सेट होण्यासाठी वेळ देत सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली होती. सूर्या अर्धशतक करून आऊट झाल्यावर रिंकूने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेत अवघ्या 39 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. या खेळीमध्ये त्याने 9 चौकार आणि 2 षटकार मारले.
दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.