SA vs IND 1st ODI Toss | साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकला, टीम इंडियाकडून नवी ओपनिंग जोडी उतरणार मैदानात
SA vs IND 1st ODI Toss : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका संघातील पहिल्या सामन्यात आफ्रिका संगाने टॉस जिंकला आहे. या सामन्यात के. एल. राहुलने कोणत्या नवीव चेहऱ्यांना संधी दिलीये जाणूून घ्या.
जोहान्सबर्ग : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिला वन डे सामना सुरू झाला आहे. या सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार मार्करम याने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला नवीन ओपनिंग जोडी मैदानात दिसणार आहे. नवीन चेहऱ्यांना वन डे सामन्यात संधी मिळाली आहे. आज एक 22 वर्षाच्या तरूण खेळाडूने इंडियाकडून डेब्यू केला आहे.
टीम इंडिया बॅटींगला उतरल्यावर आज नवीन ओपनिंग जोडी मैदानात दिसणार आहे. यामधील एका खेळाडू आज पदार्पण करणार आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून साई सुदर्शन आहे. ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन ही युवा जोडी आज मैदानात उतरेल. टीम इंडियामध्ये संजू सॅमसन याची प्लेइंग 11 मध्ये निवड झाली आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी अर्शदीप सिंग, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्यावर असणार आहे.
या मालिकेमध्ये वरिष्ठ खेळाडूंशिवाय टीम इंडिया उतरणार आहे. वर्ल्ड कपमधील तीन खेळाडू आजच्या सामन्यामध्ये खेळताना दिसणार आहेत. टीम इंडियाचे गोलंदाज साऊथ आफ्रिकेला किती धावांपर्यंत रोखतात आणि आफ्रिकेच्या तगड्या बॅटींग लाईनअपसमोर युवा खेळाडू कशी कामगिरी कतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (w/c), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार