SA vs IND 1st ODI | टीम इंडियाकडून पहिल्याच वनडेत यजमान चीतपट, मालिकेत 0-1 ने आघाडी

SA vs IND 1st ODI : टीम इंडियान आणि आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या वन डे सामन्यात यजमानांचा 8 विकेटने पराभव केला आहे. बॉलर्सच्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने सामना खिशात घातला.

SA vs IND 1st ODI | टीम इंडियाकडून पहिल्याच वनडेत यजमान चीतपट, मालिकेत 0-1 ने आघाडी
Follow us
| Updated on: Dec 17, 2023 | 6:46 PM

जोहान्सबर्ग  |टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमानांचा पराभव झाला आहे. आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाला अवघ्या 117 धावांचं लक्ष्य दिलं होतं. 17 ओव्हरमध्ये या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करत आफ्रिकेवर पहिल्या सामन्यात 8 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाकडून साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके केली. या सामन्यात विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने टीम इंडियाने आघाडी घेतली आहे.

टीम इंडियाचा डाव

आफ्रिकेने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन मैदानात उरतले होते. साईने सुरूवातीपासूनच आपला क्लास दाखवत आकर्षेक शॉट्स मारले. ऋतुराज गायकवाड परत एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. टीम इंडियाला  23 धावांवर पहिला धक्का बसला, ऋतुराज अवघ्या 5 धावा करून परतला होता. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर आणि साई सुदर्शन यांनी अर्धशतके करत टीमला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात श्रेयस 52 धावांवर माघारी परतला. तिलक वर्मा आला एक धाव केली त्यानंतर पदार्पणवीर साई  सुदर्शन याने विनिंग शॉट मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

आफ्रिकेचा डाव

टीम इंडियाच्या फक्त दोन युवा बॉलर्सनी आफ्रिकेच्या संघाला सळो की पळो करून सोडलं. अर्शदीप सिंह याने सुरूवातीपासूनच आफ्रिकेला धक्के देत सुरूवातीच्या चार विकेट आपल्या नावावर केल्या होता. अर्शदीप गेल्यावर आवेश खानने त्याचा क्लास दाखवत आफ्रिकेच्या चार विकेट घेतल्या. शेवटच्या दोन विकेटसाठी वेट करावा लागला मात्र अर्शदीपने परत एकदा कमबॅक परत पाचवी विकेट घेत विक्रम रचला. तर कुलदीप यादवे याने शेवटची विकेट घेत आफ्रिकेला गुंडाळलं.

पदर्पण सामन्यात दमदार नाबाद अर्धशतक

आजच्या  वन डे सामन्यामध्ये साई सुदर्शन याने नाबाद 55 धावांची खेळी केली. अवघ्या 43 बॉलमध्ये 9 चौकार मारत टीम इंडियाला जिंकवूनच गडी बाहेर आला. साई सुदर्शन भविष्यातील मोठा खेळाडू बनू शकतो, असं चाहते बोलू लागले आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): रीझा हेंड्रिक्स, टोनी डी झोर्झी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्करम (C), हेनरिक क्लासेन (W), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, अँडिले फेहलुकवायो, केशव महाराज, नांद्रे बर्गर, तबरेझ शम्सी

भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल (w/c), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, श्रेयस अय्यर, तिलक वर्मा, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.