मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी आफ्रिका संघाने आपली पकड मिळवली आहे. 208-8 धावांवरून पुढे खेळताना टीम इंडियाचा डाव 245 धावांवर आटोपला. के.एल. राहुल याच्या शतकी खेळीने एक सन्मानजक धावसंख्याटीम इंडियाला उभारता आली. आफ्रिका संघाने पहिल्या डावात बॅटींग करताना दुसऱ्या दिवशी 256-5 धावा केल्या. कमी प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला. आफ्रिका संघाकडे आता 11 धावांची आघाडी आहे. आफ्रिका संघाकडून डीन एल्गर याने नाबाद 140 धावा तर , मार्को जॅन्सन नाबाद 3 धावांवर खेळत आहे.
आफ्रिका संघ बॅटींगला उतरल्यावर अवघ्या 11 धावांवर मोहम्मद सिराज याने एडन मार्करम याला 5 धावांवर आऊट करत पहिला धक्का दिला. त्यानंतर टोनी डी झोर्झी आणि डीन एल्गर यांनी डावाची सूत्र आपल्या हातात घेतली. टीम इंडियाच्या गोलंदाजांना विकेट मिळू दिली नाही. 93 धावांची भागीदारी झाली असताना जसप्रीत बुमराह याने झोर्झी याला 28 धावांवर आऊट करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर पीटरसनला २ धावांवर बोल्ड करत बुमराहनेच तिसरी विकेट मिळवून दिली. मात्र तरीही त्यानंतर चौथ्या विकेटसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली.
डीन एल्गर आणि डेव्हिड बेडिंगहॅम दोघांनी शतकी भागीदारी करत यश मिळवून दिली आहे. टीम इंडियाचे बॉलर हाराकिरीला आलेले दिसले. मोहम्मद सिराज याने पदार्पणवीर डेव्हिड बेडिंगहॅम याला 56 धावांवर बोल्ड केलं. त्यानंतर आलेल्या काइल वेरेन याला प्रसिद्ध कृष्णाने आऊट केलं. टीम इंडियाने शेवटच्या सेशनमध्ये कमबॅक केलं. आता उद्या किती धावांवर रोखणार हे पाहावं लागणार आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): डीन एल्गर, एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, टेम्बा बावुमा (कर्णधार), कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर