Sa vs Ind 2nd Test | कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना, तब्बल 92 वर्षांचा रेकॉर्ड मोडला

ind vs sa 2nd test : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला दुसरा कसोटी सामना ऐतिहासिक ठरला आहे. दीड दिवसाच्या सामन्याने तब्बल 92 वर्षांचा रेकॉर्ड मोडला गेलाय.

Sa vs Ind 2nd Test | कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान सामना, तब्बल 92 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
IND vs SA 2nd Test shortest Test everImage Credit source: BCCI Twitter
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 7:20 PM

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने सात विकेटने विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्याग घातक माऱ्यासमोर आफ्रिकन फलंदाजांचा निभाव लागला नाही. पहिल्या डावात 55 तर दुसऱ्या डावात 176 वर आफ्रिकेचा डाव आटोपला. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्यासमोर यजमानांनी नांगी टाकली. अवघ्या दीड दिवसात कसोटी सामन्याचा निकाला लागल आहे. हा सामना कसोटी इतिहासातील सर्वात कमी बॉल खेळला गेलेला सामना ठरला आहे.

केप टाऊनवर पार पडलेल्या सामन्याची इतिहासात नोंद झाली आहे. कसोटीमधील 92 वर्षांचा इतिहास मोडला गेलाय. 1932 साली मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेला सामना सर्वात कमी बॉल्सचा ठरला होता. 656 बॉल्मध्ये हा सामना आटोपला होता. ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 72 धावांनी विजय मिळवला होता.

1935 साली वेस्ट इंडिज आणि इंग्लंडमध्ये झालेला सामना 672बॉल्सचा झाला होता. यामध्ये इंग्लंड संघाने 4 विकेटने विजय मिळवला होता. हा कसोटीमधील कमी बॉल्सचा दुसरा सामना ठरला होता.  इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामधये 1988 मध्ये झालेला सामना 788 बॉल्सचा झाला होता. मँचेस्टर येथे झालेल्या सामन्यात इंग्लंड संघ एक डाव आणि 21 धावांनी जिंकला होता. 1888 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेला सामना 792 बॉल्सचा झाला होता. लॉर्ड्सवर पार पडलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 61 धावांनी विजय मिळवला होता.

दरम्यान, साऊथ आफ्रिका आणि टीम इंडियामध्ये झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हे सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. टीम इंडियाने या सामन्यात सात विकेटने विजय मिळवला आहे. मोहम्मद सिराज याला या सामन्यात सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.

डीन एल्गर (कॅप्टन), एडन मार्करम, टोनी डी झोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (विकेटकीपर), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी

रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.