IPL Update : आयपीएलमध्ये अक्षर पटेलनंतर ‘या’ खेळाडूला लागली कर्णधारपदाची लॉटरी

ऋषभ पंतचं कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरकडे सोपवलं आहे. तर संघाचं उपकर्णधारपद हे अक्षर पटेलकडे देण्यात आलं आहे. अशातच आणखी एका संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

IPL Update : आयपीएलमध्ये अक्षर पटेलनंतर 'या' खेळाडूला लागली कर्णधारपदाची लॉटरी
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 8:12 PM

मुंबई : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक समोर आलं आहे. प्रत्येक संघाने लिलावामध्ये आपल्याला लागणाऱ्या खेळाडूंना बोली लावून ताफ्यात घेतलं आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाने अपघातामुळे आयपीएलमधून बाहेर पडलेल्या ऋषभ पंतचं कर्णधारपद डेव्हिड वॉर्नरकडे सोपवलं आहे. तर संघाचं उपकर्णधारपद हे अक्षर पटेलकडे देण्यात आलं आहे. अशातच आणखी एका संघाने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2023 साठी नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एडन मार्करमची आयपीएल फ्रँचायझी सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 16व्या हंगामात तो संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. सनरायझर्स हैदराबादने ट्विट करून आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

2016 मध्ये आयपीएल विजेतेपद जिंकणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 16 च्या मिनी-लिलावापूर्वी नियमित कर्णधार केन विल्यमसनला सोडलं. त्यानंतर मयंक अग्रवाल, मार्करम आणि भुवनेश्वर कुमार कर्णधारपदाचे दावेदार म्हणून शर्यतीत होते. मात्र संघ व्यवस्थापनाने मार्करम विश्वास ठेवला असून त्याच्याकडे संघाची जबाबदारी सोपवली आहे.

मार्करमने आयपीएल 2021 मध्ये 6 सामन्यात 146 धावा केल्या. तर आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी केली होती. चांगली 14 सामन्यांमध्ये 381 धावा केल्या. यामध्ये त्याने तीन अर्धशतकेही झळकावली. आयपीएलमध्ये त्याने 20 सामन्यांमध्ये 134 च्या स्ट्राईक रेटने 527 धावा केल्या आहेत.

दरम्यान, सनरायजर्स हैदराबादच्या टीमने मागच्या सीजनआधी डेविड वॉर्नरला रिलीज केलं. त्यानंतर वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सने 6.25 कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं. डेविड वॉर्नर आता दिल्लीच्या टीमच नेतृत्व करणार आहे. तेच ऑलराऊंडर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे.

IPL 2023 साठी SRH पूर्ण संघ- अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, भुवनेश्वर कुमार, फजलहक फारुकी, ग्लेन फिलिप्स, कार्तिक त्यागी, मार्को यान्सेन, राहुल त्रिपाठी, टी. नटराजन, उमरान मलिक, वॉशिंग्टन सुनदर सिंग, अनमोल सिंग , अकेल होसेन, नितीश कुमार रेड्डी, मयंक डागर, उपेंद्र यादव, सनवीर सिंग, समर्थ व्यास, विव्रत शर्मा, मयंक मार्कंडे, आदिल रशीद, हेनरिक क्लासेन, मयंक अग्रवाल, हॅरी ब्रूक

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.