‘कोरोनाचा काळ कठीण, भारतीयांसाठी माझी वारंवार प्रार्थना’, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची इमोशनल पोस्ट वाचलीत?

मी भारतीय लोकांसाठी सतत प्रार्थना करतोय कारण या कठीण प्रसंगातून ते लवकरात लवकर बाहेर येवोत, आपण स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या", असं फॅफने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (South African Cricketer Faf Du plessis Write Emotional Post During Covid 19)

'कोरोनाचा काळ कठीण, भारतीयांसाठी माझी वारंवार प्रार्थना', दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूची इमोशनल पोस्ट वाचलीत?
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू फॅफ डू प्लेसीसची इमोशनल पोस्ट...
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 10:12 AM

मुंबई : देशभर कोरोनाचा उद्रेक होत असताना आता आयपीएललाही कोरोनाने गाठल्यानंतर थाटात सुरु असलेला आयपीएल 2021 चा  (IPL 2021)  14 वा हंगाम स्थगित करण्यात आला. या स्पर्धेत एकूण एकूण 29 सामने खेळले गेले. उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले. आयपीएल स्थगित झाल्यानंतर क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना आयपीएल स्पर्धेची आठवण येत आहे. दक्षिण आफ्रिकेचा तडाखेबाज खेळाडू फॅफ डू प्लेसीसने आयपीएलच्या आठवणीत एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. (South African Cricketer Faf Du plessis Write Emotional Post During Covid 19)

फॅफ डू प्लेसीसला सतावतेय आयपीएलची आठवण

आयपीएल स्थगितीची घोषणा झाल्यानंतर भारतीय खेळाडूंबरोबर परदेशी खेळाडूंचाही हिरमूड झालाय. जशी आयपीएल स्थगित झालीय तसे परदेशी खेळाडू विविध पोस्ट करुन आयपीएलच्या आठवणींना उजाळा देत आहेत. दक्षिण आफ्रिकन खेळाडू तथा चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर फॅफ डू प्लेसीस याने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने आयपीएलची आठवण येत असल्याचं म्हटलं आहे.

‘भारतीय लोकांसाठी सतत प्रार्थना करतोय…..’

“आयपीएलचं 14 वं पर्व तसंच चेन्नईच्या परिवाराला सोडून जाण्याचं दु:ख होतंय. आमची टीम 14 व्या पर्वात शानदार फॉर्मात होती. मी भारतीय लोकांसाठी सतत प्रार्थना करतोय कारण या कठीण प्रसंगातून ते लवकरात लवकर बाहेर येवोत, आपण स्वत:ची आणि कुटुंबीयांची काळजी घ्या”, असं फॅफने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Faf du plessis (@fafdup)

चेन्नईचा दमदार फॉर्म

आयपीएलचा 13 वा मोसम चेन्नईसाठी विशेष राहिला नव्हता किंबहुना साखळी फेरीतच चेन्नई गारद झाली होती. परंतु आयपीएलच्या 14 व्या पर्वात चेन्नईने बहारदार परफॉर्मन्स केला. चेन्नईने एकूण 7 मॅचेस खेळल्या ज्यापैकी 5 मॅचेसमध्ये त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना पराभवाची धूळ चारली.

(South African Cricketer Faf Du plessis Write Emotional Post During Covid 19)

हे ही वाचा :

भारताच्या धडाकेबाज क्रिकेटपटूवर दुःखाचा डोंगर, आईपाठोपाठ बहिणीचा कोरोनाने मृत्यू

कोरोनाकाळात घोडेसवारी, रवींद्र जाडेजा म्हणतो, ‘मी आता पूर्णपणे सुरक्षित…!’

क्रिकेट विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला, 36 वर्षीय विवेक यादवचं कोरोनाने निधन

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.