वरुण चक्रवर्तीचा पंच, पण..! दक्षिण अफ्रिकेने 3 गडी राखून केलं पराभूत

टीम इंडियाने सलग दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला लोळवलं आहे. भारताने 124 धावांचं सोपं आव्हान दक्षिण अफ्रिकेसमोर ठेवलं होतं. मात्र हे आव्हान दक्षिण अफ्रिकेला सोपं गेलं नाही. वरुण चक्रवर्तीच्या फिरकीपुढे दक्षिण अफ्रिकेची दाणादाण उडाली.

वरुण चक्रवर्तीचा पंच, पण..! दक्षिण अफ्रिकेने 3 गडी राखून केलं पराभूत
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 2:45 PM

भारत आणि दक्षिण मालिकेतील दुसरा टी20 सामना भारताने नावावर केला आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण अफ्रिकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर दक्षिण अफ्रिकेच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाजांचं फार काही चाललं नाही. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव सर्वच फेल गेले. त्यामुळे या सामन्यात मोठी धावसंख्या करणं कठीण झालं होतं. भारताची धावसंख्या 100 च्या पुढे जाते की नाही असा प्रश्न होता. पण हार्दिक पांड्याने चांगली फलंदाजी केली आणि भारताला कसं बसं 124 धावांवर पोहोचवलं. दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासठी 125 धावांचं आव्हान होतं. हे आव्हान दक्षिण अफ्रिका सहज गाठेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. सर्वकाही व्यवस्थित सुरु असताना मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा दणका दक्षिण अफ्रिकन फलंदाजांना बसला. त्याचा गोलंदाजीचा सामना करताना एक एक करत विकेट पडत गेल्या. रीझा हेन्ड्रीक, एडन मार्करम, मार्को यानसेन, हेनरिक क्लासेन आणि डेविड मिलर हे वरुणच्या जाळ्यात अडकले. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेवरील दबाव वाढला. एकीकडे ट्रिस्टन स्टब्स झुंज देत होता. त्यामुळे विजय कोणाच्या पारड्यात पडेल याबाबत शंका होती. अखेर ट्रिस्टन स्टब्सने भारतीय गोलंदाजीचा सामना करत विजय मिळवून दिला. दक्षिण अफ्रिकेने भारतावर 3 गडी राखून विजय मिळवला.

वरुण चक्रवर्तीने 4 षचटकात 17 धावा देत 5 गडी बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे दक्षिण अफ्रिका संघ अडचणी आला. ट्रिस्टन स्टब्सने 41 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने नाबाद 47 धावा केल्या आणि विजय मिळवून दिला. त्याला गेराल्ड कोएत्झीची उत्तम साथ लाभली. त्याने 9 चेंडूत 2 चौकार आणि एक षटकार मारत 19 धावा केल्या. या पराभवामुळे भारताचं सलग 12 सामने जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. झिम्बाब्वेविरुद्ध 4, श्रीलंकेविरुद्ध 3, बांगलादेशविरुद्ध 3 आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 1 सामना जिंकला होता.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन : एडन मार्करम (कर्णधार), रायन रिकेल्टन, रीझा हेंड्रिक्स, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेव्हिड मिलर, मार्को जॅनसेन, अँडीले सिमेलेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज आणि न्काबायोमझी पीटर

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती आणि आवेश खान.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.