Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? क्रीडा मंत्री म्हणाले..

Anurag Thakur On India vs Pakistan Bilateral Series | टीम इंडिया-पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून द्विपक्षीय मालिका झालेली नाही. आता याबाबत क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर काय म्हणाले?

IND vs PAK | टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिका होणार? क्रीडा मंत्री म्हणाले..
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 5:18 PM

मुंबई | भारत आणि पाकिस्तान, या दोन्ही देशात गेल्या अनेक वर्षांपासूनचे तणावपूर्ण संबंध आहेत. पाकिस्तानकडून आतापर्यंत अनेकदा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. यामध्ये भारताचे अनेक जवान शहीद झालेत. तसेच याच पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर 2008 साली दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप मृत्यूमुखी पडले. यामुळे पाकिस्तानची मस्ती जिरवण्यासाठी भारत सरकारने आतापर्यंत अनेक निर्णय घेतलेत. इतकंच काय या संबंधांचा परिणाम हा इतर क्षेत्रांवरही झालाय.

पाकिस्तानी कलाकारांना भारतातून हाकलून लावण्यात आलंय. तसेच पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाही. दोन्ही देशातीलं तणावपूर्ण संबंधांमुळे टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात 2013 पासून द्विपक्षीय क्रिकेट मालिकाही खेळवण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही संघ फक्त आता आयसीसी आणि आशिया कप स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. या दोन्ही संघामधील सामन्यांची प्रतिक्षा ही क्रिकेट विश्वाला असते. टीम इंडियाने नुकतंच आशिया कप 2023 सुपर 4 मध्ये पाकिस्तानचा धुव्वा उडवला.

आता या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका आमनेसामने आहेत. या दरम्यान टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय क्रीडामंत्री अनूराग ठाकूर यांनी या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील द्विपक्षीय मालिकेबाबत मोठं विधान केलं आहे.

अनुराग ठाकूर काय म्हणाले?

“जिथवर खेळाचाच प्रश्न आहे, तर बीसीसीआयने याबाबत खूप आधीच निर्णय घेतलाय. जोवर पाकिस्तान सीमेवरील कुरापती थांबवत नाहीत तोवर टीम इंडिया-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार नाही. मला वाटतं की हीच आणि अशीच प्रत्येक नागरिकाची भावना आहे”, असं अनुराग ठाकूर म्हणाले.

अनुराग ठाकूर यांची टीम इंडिया-पाकिस्तान द्विपक्षीय मालिकेबाबत प्रतिक्रिया

टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने

दरम्यान आगामी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेपेक्षा क्रिकेट चाहत्यांना 14 ऑक्टोबरची प्रतिक्षा आहे. कारण 14 ऑक्टोबरला टीम इंडिया-पाकिस्तान चीर प्रतिद्वंदी भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.