Kedar Jadhav MPL 2023 | केदार धमाकेदार, सोलापूर विरुद्ध वादळी खेळी, विक्रमाला गवसणी
SR vs KT MPL 2023 | केदार जाधव याने सोलापूर रॉयल्स विरुद्ध तडाखेदार खेळी केली. केदारने 85 धावांच्या खेळीदरम्यान शानदार फटकेबाजी केली.
पुणे | महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील आठव्या सामन्यात केदार जाधव याचा धमाका पाहायला मिळाला. कोल्हापूर टस्कर्सचा कॅप्टन केदारने सोलापूर रॉयल्स विरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली. केदारने 85 धावांची खेळी केली. केदारने या अर्धशतकी खेळीत मैदानात चौफेर फटकेबाजी केली. केदारला शतक ठोकण्याची संधी होती. मात्र थोडक्यासाठी केदारचं शतकाचं स्वप्न अधुरं राहिलं.
केदार जाधव याने 52 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 11 चौकारांच्या मदतीने 85 धावांची धमाकेदार खेळी केली. केदारने या दरम्यान सोलापूरच्या गोलंदाजांना चांगलाच फोडून काढला. मात्र कॅप्टननेच कॅप्टनचीच विकेट काढली. सत्यजीत बच्छाव याने केदारला रुषभ राठोड याच्या हाती कॅच आऊट केलं.
पहिल्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी
दरम्यान केदारने 85 धावांची खेळीसह कोल्हापूरला शानदार सुरुवातही मिळवून दिली. अंकित बावने आणि केदार जाधव या दोघांनी 16 ओव्हरमध्ये 154 धावांची सलामी भागीदारी केली. एमपीएल स्पर्धेच्या इतिहासात ही विक्रमी सलामी भागीदारी ठरली आहे. अंकित बावने याने 47 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 134.0 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या.
कोल्हापूर टस्कर्स प्लेइंग इलेव्हन | केदार जाधव (कॅप्टन आणि विकेटकीपर), अंकित बावणे, नौशाद शेख, कीर्तीराज वाडेकर, सिद्धार्थ म्हात्रे, साहिल औताडे, तरणजितसिंग ढिल्लोन, अक्षय दरेकर, मनोज यादव, श्रेयश चव्हाण, आत्मा पोरे आणि निहाल तुसमद.
सोलापूर रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | सत्यजीत बच्छाव (कॅप्टन), यश नहार, प्रवीण देशेट्टी, विशांत मोरे (विकेटकीपर), रुषभ राठोड, स्वप्नील फुलपगार, सुनील यादव, विकी ओस्तवाल, मेहुल पटेल, प्रथमेश गावडे, प्रणय सिंग आणि अथर्व काळे.