Aiden Markram चं खणखणीत अर्धशतक, हैदराबादचा चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

SRH vs CSK Highlights In Marathi : सनरायजर्स हैदराबादने पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात घरच्या मैदानात सलग दुसरा विजय मिळवला आहे. हैदराबादने चेन्नईचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.

Aiden Markram चं खणखणीत अर्धशतक, हैदराबादचा चेन्नईवर 6 विकेट्सने विजय
aiden markram fifty srh ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: Apr 05, 2024 | 11:32 PM

सनराजर्स हैदराबादने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 18 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने हैदराबादला विजयासाठी 166 धावांचं आव्हान दिलं होतं. हैदराबादने हे आव्हान 11 बॉलआधीच 18.1 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. हैदराबादचा हा चौथ्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. हैदराबादने दोन्ही विजय हे आपल्या घरच्या मैदानात मिळवले. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सला पहिल्या सलग 2 विजयानंतर सलग 2 सामने गमवावे लागले आहेत.

हैदराबादकडून माजी कर्णधार एडन मारक्रम याने 36 बॉलमध्ये 4 फोर आणि 1 सिक्ससह 50 धावांची खेळी केली. अभिषेक शर्मा याने 12 बॉलमध्ये 3 चौकार आणि 4 सिक्ससह 37 धावांची स्फोटक खेळी केली. ट्रेव्हिस हेड याने 24 बॉलमध्ये 31 धावा केल्या. तर शाहबाज अहमद याने 18 धावांचं योगदान दिलं. हेन्रिक क्लासेन आणि नितीश रेड्डी दोघे नाबाद परतले. या दोघांनी 10 आणि 14 धावा केल्या. तर चेन्नईकडून मोईन अली याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.  महीश तीक्षणा आणि दीपक चाहर या दोघांनी 1-1 विकेट घेतली.

चेन्नईची बॅटिंग

त्याआधी पंजाब किंग्नसने टॉस जिंकला. पंजाबचा कॅप्टन शिखर धवन याने चेन्नईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. चेन्नईकडून शिवम दुबे याने सर्वाधिक 45 धावा केल्या. तर अजिंक्य रहाणे 35, रवींद्र जडेजा याने 31*, कॅप्टन ऋतुराज गायकवाड 26, डॅरेल मिचेल 13 आणि रचीन रवींद्र याने 12 धावा केल्या. तर धोनी याने 1 धाव केली. तर भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, कॅप्टन पॅट कमिन्स, शाहबाज अहमद आणि जयदेव उनाडकट या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

हैदराबादचा घरच्या मैदानात सलग दुसरा विजय

सनरायझर्स हैदराबाद प्लेईंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, एडन मारक्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, जयदेव उनाडकट, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेईंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश तीक्षना.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.