SRH vs KKR IPL 2023 Highlights | कोलकाता नाईट रायडर्सचा सनरायजर्स हैदराबादवर 5 रन्सने थरारक विजय
SRH vs KKR IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएल 16 व्या सिजनमध्ये आज 5 मे रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने होते. या सामन्यात केकेआरने 5 धावांनी विजय मिळवलाय.
हैदराबाद | आयपीएल 16 व्या सिजनमधील 47 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमेसामने होते. या सामन्यांच आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात केकेआरने हैदराबादवर 5 धावांनी शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवला. केकेआरचा हा या मोसमातील चौथा विजय ठरला. तर हैदराबादच्या पराभवामुळे त्यांचं जवळपास आव्हान संपुष्ठात आलंय.
LIVE Cricket Score & Updates
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | वरुण चक्रवर्थीची कमाल, केकेआरचा 5 धावांनी विजय
कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादवर थरारक विजय मिळवला आहे. केकेआरने हैदराबादवर 5 धावांनी मात केली आहे. केकेआरने हैदराबादला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र केकेआरच्या गोलंदाजांसमोर हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या. हैदराबादला शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी फक्त 9 धावांची गरज होती. मात्र वरुण चक्रवर्थी याने शानदार पद्धतीने या 9 धावांचा बचाव केला. वरुणने फक्त 3 धावा देत केकेआरला विजय मिळवून दिला. केकेआरचा हा या मोसमातला चौथा विजय ठरला आहे. तर हैदराबादचा पराभवामुळे या हंगामातील आव्हान जवळपास संपुष्ठात आलंय.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबादला आठवा धक्का
हैदराबादने आठवी विकेट गमावली आहे. अब्दुल समद 21 धावा करुन आऊट झाला आहे. त्यामुळे हैदराबादला विजयासाठी 3 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे.
-
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | एडन मार्करम आऊट
सनरायजर्स हैदराबादने सहावी विकेट गमावली आहे. एडन मार्करम 41 धावा करुन आऊट झाला आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हेनरिच क्लासेन आऊट
कोलकाता नाईट रायडर्सने पाचवी विकेट गमावली आहे. हेनरिच क्लासेन 20 बॉलमध्ये 36 रन्स करुन आऊट झाला.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबादला चौथा झटका
केकेआरने डीआरएसचा हुशारीने वापर करत आणखी एक विकेट मिळवली आहे. हॅरी ब्रूक झिरोवर आऊट झाला आहे. हैदराबादलने चौथी विकेट गमावली आहे.
-
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबादला तिसरा धक्का
केकेआरने हैदराबादला तिसरा झटका दिलाय. आंद्रे रसेल याने राहुल त्रिपाठी याला 20 धावांवर वैभव अरोरा याच्या हाती कॅच आऊट केलं.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबादला दुसरा झटका
सनरायजर्स हैदराबादला दुसरा झटका लागला आहे. शार्दुल ठाकूर याने अभिषेक शर्मा याला 8 धावांवर आंद्रे रसेल याच्या हाती कॅचआऊट केलं.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबादला पहिला धक्का
केकेआरने हैदराबादने पहिला झटका दिला आहे. मयंक अग्रवाल 18 धावा करुन आऊट झाला आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मयंक अग्रवाल आणि अभिषेक शर्मा ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबादसमोर 172 धावांचं लक्ष्य
कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादला विजयासाठी 172 धावांचे आव्हान दिले आहे. केकेआरने 9 विकेट्स गमावून निर्धारित 20 ओव्हरमध्ये 171 धावा केल्या. केकेआरकडून रिंकू सिंह याने सर्वाधिक 46 धावा केल्या. कॅप्टन नितीश राणा याने 42 धावांचं योगदान दिलं. आंद्रे रसेल याने 24 धावा केल्या. जेसन रॉय 20 धावा करुन माघारी परतला. अनुकूल रॉय याने नॉट आऊट 13 आणि वैभव अरोरा याने नाबाद 2 धावा केल्या.दोघांना भोपळाही फोडता आला नाही. तिघांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आलं. हैदराबादकडून टी नटराजन आणि मार्को जान्सेन या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, कॅप्टन एडन मार्करम आणि मयांक मार्कंडे या चौकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | केकेआरला सातवा धक्का
केकेआरने सातवी विकेट गमावली आहे. शार्दुल ठाकूर 8 धावा करुन बाद झाला आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | सुनील नरेन आऊट
केकेआरने सहावी विकेट गमावली आहे. सुनील नरेन अवघी 1 धावा करुन आऊट झालाय.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | कोलकाताला पाचवा धक्का, अर्धा संघ तंबूत
कोलकाताने पाचवी विकेट गमावली आहे. धोकादायक आणि हार्ड हीटर आंद्रे रसेल आऊट झाला आहे . आंद्रे रसेल याने 15 बॉलमध्ये 24 धावांची खेळी केली.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | केकेआरला मोठा झटका
केकेआरने चौथी विकेट गमावली आहे. कॅप्टन नितीश राणा याने 31 बॉलमध्ये 42 रन्स केल्या.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | केकेआरला तिसरा धक्का
केकेआरने तिरवी विकेट गमावली आहे. जेसन रॉय 19 बॉलमध्ये 20 धावा करुन माघारी परतला आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | केकेआरला मोठा धक्का, वेंकटेश अय्यर माघारी
केकेआरने दुसरी आणि मोठी विकेट गमावली आहे. वेंकटेश अय्यर हा 7 धावा करुन माघारी परतला आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | रहमनुल्लाह गुरुबाज आऊट
केकेआरने पहिली विकेट गमावली आहे. ओपनर रहमनुल्लाह गुरुबाज हा झिरोवर आऊट झाला आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | सामन्याला सुरुवात, केकेआरची पहिले बॅटिंग
केकेआर विरुद्ध हैदराबाद सामन्याला सुरुवात झाली आहे. केकेआरकडून जेसन रॉय आणि रहमानुल्लाह गुरुबाज ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. केकेआरने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन | नितीश राणा (कर्णधार), जेसन रॉय, वेंकटेश अय्यर, आर गुरबाज (विकेटकीपर), सुनील नरेन, आर सिंग, आंद्रे रसेल, शार्दुल ठाकूर, एच राणा, वैभव अरोरा आणि वरुण चक्रवर्ती.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडन मार्कराम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (wk), हॅरी ब्रूक, अब्दुल समद, मार्को जान्सेन, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, कार्तिक त्यागी आणि टी नटराजन.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | केकेआरने टॉस जिंकला
कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकला आहे. कॅप्टन नितीश राणा याने पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपल्या घरच्या मैदानात हैदराबाद केकेआरला किती धावांपर्यंत रोखणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | आकडेवारी कुणाच्या बाजूने?
आयपीएल मध्ये आतापर्यंत सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स एकूण 24 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये केकेआरचा वरचष्मा आहे. केकेआरने 15 वेळा बाजी मारली आहे. तर हैदराबादला 9 वेळा विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आता हैदराबाद हा सामना जिंकून केकेआर विरुद्ध 10 वा विजय साजरा करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
-
SRH vs KKR IPL 2023 Live Score | हैदराबाद विरुद्ध केकेआर यांच्यात ‘काँटे की टक्कर’
आयपीएल 16 व्या सिजनमध्ये आज हैदराबाद विरुद्ध केकेआर यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या आणि हैदराबाद नवव्या स्थानी आहेत. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्वाचा असा असणार आहे.
हैदराबाद विरुद्ध केकेआर
Hello from Hyderabad ????@SunRisers face @KKRiders at home in Match 4️⃣7️⃣ of #TATAIPL 2023 ????
Who will emerge victorious in the #SRHvKKR contest? pic.twitter.com/I4RC96QCk9
— IndianPremierLeague (@IPL) May 4, 2023
Published On - May 04,2023 6:21 PM