SRH vs KKR, IPL 2021 Match 3 Result | कोलकाता ‘जितबो रे’, हैदराबादवर 10 धावांनी विजय

| Updated on: Apr 11, 2021 | 11:59 PM

SRH vs KKR Live Score Marathi | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने

SRH vs KKR, IPL 2021 Match 3 Result | कोलकाता 'जितबो रे', हैदराबादवर 10 धावांनी विजय
SRH vs KKR Live Score Marathi | सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने

चेन्नई : आयपीएल 2021 स्पर्धेतील तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी मात केली आहे. कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान हैदराबादच्या फलंदाजांना पेलवले नाही. हैदराबादकडून जॉनी बेअरस्टो (55) आणि मनिष पांडे (61) या दोघांचे प्रयत्न कमी पडले. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. (srh vs kkr live score ipl 2021 match sunrisers hyderabad vs kolkata knight riders scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi)

SRH vs KKR Live Score जाणून घेण्यासाठी क्लिक करा 

Key Events

‘राणा’दाने विजयाचा पाया रचला

केकेआर विरुद्ध एसआरएच सामन्यात हैदराबादने टॉस जिंकून कोलकात्याला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. या सामन्यात कोलकात्याचा सलामीवीर नितीश राणाने 56 चेंडूत 80 धावांची खेळी करत कोलकात्याच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीने (53) अर्धशतक ठोकत कोलकात्याला मजबूत धावसंख्या उभारून दिली. शेवटच्या षटकात फटकेबाजी करत दिनेश कार्तिकने कोलकात्याला 180 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

कोलकात्याची टिच्चून गोलंदाजी

कोलकात्याने हैदराबादला 188 धावांचे आव्हान दिले होते. केकेआरच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत या आव्हानाचा बचाव केला. त्यातही प्रामुख्याने शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे हैदराबादला विजयी आव्हान पूर्ण करता आले नाही. अखेर कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला. कोलकात्याकडून प्रसिद्ध कृष्णाने दोन तर शाकीब अल हसन, पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 11 Apr 2021 11:01 PM (IST)

    कोलकात्याचा 10 धावांनी विजय

    शेवटच्या षटकात आंद्रे रसेलने केलेल्या टिच्चून गोलंदाजीमुळे हैदराबादला विजयी आव्हान पूर्ण करता आले नाही. अखेर कोलकात्याने हैदराबादवर 10 धावांनी विजय मिळवला.

  • 11 Apr 2021 10:59 PM (IST)

    अब्दुल समदचे 19 व्या ओव्हरमध्ये 2 षटकार

    अब्दुल समदने 19 व्या ओव्हरमध्ये 2 षटकार लगावले आहेत.  त्यामुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. आता हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 22 धावांची आवश्यकता आहे.

  • 11 Apr 2021 10:56 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 38 धावांची आवश्यकता

    हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 38 धावांची आवश्यकता आहे. मनिष पांडे सेट फलंदाज मैदानात खेळत आहे. तसेच अब्दुल समद  मनिषसोबत खेळत आहे.

  • 11 Apr 2021 10:55 PM (IST)

    हैदराबादला पाचवा धक्का

    हैदराबादला पाचवा धक्का हसला आहे. विजय शंकर आऊट झाला आहे. हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 38 धावांची आवश्यकता आहे. मनिष पांडे सेट फलंदाज मैदानात खेळत आहे.

  • 11 Apr 2021 10:48 PM (IST)

    मनिष पांडेचे अर्धशतक

    मनिष पांडेचे अर्धशतक पूर्ण झालं आहे.  सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. हैदराबादला विजयासाठी 18 चेंडूत 44 धावांची आवश्यकता आहे.

  • 11 Apr 2021 10:45 PM (IST)

    हैदराबादला चौथा झटका

    हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे.  मोहम्मद नबी आऊट झाला आहे. त्यामुळे हैदराबाद  सामन्यात थोड्या प्रमाणात पिछाडीवर पडली आहे.

  • 11 Apr 2021 10:27 PM (IST)

    हैदराबादला तिसरा झटका

    पॅट कमिन्सने हैदराबादला तिसरा धक्का दिला आहे. पॅटने सेट बॅट्समन जॉनी बेयरस्टोला 55 धावांवर नितीश राणाच्या हाती कॅच आऊट केलं आहे. त्यामुळे हैदराबादची 13 ओव्हरमध्ये  3 बाद 102  अशी धावसंख्या झाली आहे.

  • 11 Apr 2021 10:21 PM (IST)

    सिक्स खेचत जॉनी बेयरस्टोचे 32 चेंडूत अफलातून अर्धशतक

    जॉनी बेयरस्टोने सिक्स खेचत 32 चेंडूत अफलातून अर्धशतक पूर्ण केलं आहे. हैदराबादची 10 बाद 2 अशी स्थिती झाली होती. मात्र त्यानंतर बेयरस्टोने मनिष पांडेसोबत हैदराबादचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकापेक्षा अधिक भागीदारी केली. यादरम्यान त्याने अर्धशतक झळकावलं.

  • 11 Apr 2021 10:02 PM (IST)

    तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    जॉनी बेयरस्टो आणि मनिष पांडेने तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे. हैदराबादची निराशाजनक राहिली. हैदराबादने पहिल्या 2 विकेट्स 10 धावांवर गमावल्या. त्यामुळे हैदराबादची नाजूक स्थिती झाली. मात्र त्यानंतर या जोडीने हैदराबादचा डाव सावरला. या भागीदारीदरम्यान दोघांनी चांगली फटकेबाजी केली.

  • 11 Apr 2021 09:58 PM (IST)

    जॉनी बेयरस्टोचा सिक्स, हैदराबाद 50 पार

    जॉनी बेयरस्टोने सामन्यातील 8 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर आंद्रे रसेलच्या चेंडूवर शानदार सिक्स खेचला. यासह हैदराबादच्या 50 धावा पूर्ण झाल्या.

  • 11 Apr 2021 09:55 PM (IST)

    हैदराबादच्या पावर प्लेमध्ये 35 धावा

    हैदराबादने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून  35 धावा केल्या आहेत. दरम्यान सध्या मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी खेळत आहे.

  • 11 Apr 2021 09:42 PM (IST)

    हैदराबादला दुसरा धक्का

    शाकिब अल हसनने हैदराबादला दुसरा धक्का दिला आहे. शाकिबने रिद्धीमान साहाला बोल्ड केलं आहे.  रिद्धीमानने  7 धावा केल्या. साहा बाद झाल्याने हैदराबादची 10 बाद 2 अशी नाजूक स्थिती झाली आहे. दरम्यान मैदानात आता मनिष पांडे आणि जॉनी बेयरस्टो ही जोडी खेळत आहे.

  • 11 Apr 2021 09:35 PM (IST)

    हैदराबादला पहिला धक्का

    प्रसिद्ध कृष्णाने हैदराबादला पहिला धक्का दिला आहे. प्रसिद्धने हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या हाती कॅच आऊट केलं. वॉर्नरने  3 धावा केल्या.

  • 11 Apr 2021 09:32 PM (IST)

    पॅट कमिन्सकडून डेव्हिड वॉर्नरला जीवनदान

    पॅट कमिन्सने डेव्हिड वॉर्नरला पहिल्याच ओव्हरमध्ये जीवनदान दिलं आहे. हरभजनसिंहच्या बोलिंगवर वॉर्नरने फटका मारला. हा चेंडू पॅटच्या दिशेने गेला. मात्र पॅटला वॉर्नरचा कॅच घेता आला नाही.

  • 11 Apr 2021 09:30 PM (IST)

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नर आणि रिद्धीमान साहा सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले आहे.

  • 11 Apr 2021 09:15 PM (IST)

    हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान

    नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीने केलेल्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने हैदराबादला विजयासाठी 188 धावांचे आव्हान दिले आहे. कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. नितीश राणाने सर्वाधिक 80 धावांची खेळी केली. तर राहुल त्रिपाठीने 53 धावांची झंझावाती अर्धशतकी खेळी केली. हैदराबादकडून मोहम्मद नबी आणि रशीद खान या फिरकी जोडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

  • 11 Apr 2021 09:02 PM (IST)

    मोहम्मद नबीकडून कोलकाताला 2 चेंडूत 2 धक्के

    मोहम्मद नबीने कोलकाताला बॅक टु बॅक 2 धक्के दिले आहेत. नबीने आधी नितीश राणा आणि त्यानंतर कर्णधार इयोन मॉर्नगला आऊट केलं. यामुळे हैदराबादने सामन्यात पुनरागमन केलं आहे.

  • 11 Apr 2021 08:54 PM (IST)

    कोलकाताला तिसरा धक्का

    राशिद खानने कोलकाताला तिसरा धक्का दिला आहे.  राशिदने आक्रमक आंद्रे रसेलला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.  राशिदच्या बोलिंगवर आंद्रेने लॉन्ग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारला. मात्र तिथे असलेल्या मनिष पांडेने अचूक झेल टिपला. यामुळे रसेलला मैदानाबाहेर जावे लागले.

  • 11 Apr 2021 08:48 PM (IST)

    कोलकाताला दुसरा धक्का

    कोलकाताने दुसरी विकेट गमावली आहे. अर्धशतकी खेळीनंतर राहुल त्रिपाठी आऊट झाला आहे. टी नटराजनने विकेटकीपर रिद्धीमान साहाच्या हाती राहुलला कॅच आऊट केलं. राहुलने 53 धावांची झंझावाती खेळी केली.

  • 11 Apr 2021 08:44 PM (IST)

    राहुल त्रिपाठीचे अर्धशतक

    राहुल त्रिपाठीने चौकार ठोकत अर्धशतक लगावलं आहे. राहुलने अवघ्या 28 चेंडूत झळकावलं अर्धशतक लगावलं. हे अर्धशतक त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 6 वं अर्धशतक ठरलं.

  • 11 Apr 2021 08:34 PM (IST)

    दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

    नितीश राणा आणि राहुल त्रिपाठीने दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आहे.  कोलकाताला 53 धावांवर शुबमन गिलच्या रुपात पहिला धक्का बसला. त्यानंतर राहुल त्रिपाठी मैदानात आला. नितीशने राहुलच्या सोबतीने जोरदार फटकेबाजी केली. तसेच दुसऱ्या बाजूनेही राहुलने चांगली साथ दिली. दरम्यान सध्या दोन्ही फलंदाज चांगलेच सेट झाले आहेत.

  • 11 Apr 2021 08:28 PM (IST)

    राणाचा जोरदार सिक्स, कोलकाताच्या 100 धावा पूर्ण

    कोलकाताच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत.  नितीश राणाने 12 व्या ओव्हरमध्ये  जोरदार सिक्स खेचला. यासह कोलकाताने 100 धावांचा टप्पा पार केला.

  • 11 Apr 2021 08:22 PM (IST)

    सिक्स खेचत नितीश राणाचे शानदार अर्धशतक पूर्ण

    कोलकाताचा सलामीवीर नितीश राणाने सिक्स खेचत अर्धशतक पूर्ण केलं आहे. नितीशने 37 चेंडूत अर्धशतक झळकावलं. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. नितीशने चौकाराने आपल्या डावाची सुरुवात केली. तर सिक्सह हाफ सेंच्युरी पूर्ण केली. नितीश मैदानात सेट झाला आहे. त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.

  • 11 Apr 2021 08:06 PM (IST)

    कोलकाताला पहिला झटका

    राशिद खानने कोलकाताला पहिला धक्का दिला आहे. राशिदने ओपनर शुबमन गिलला आऊट केलं आहे. राशिदने शुबमनला 15 धावांवर बोल्ड केलं.

  • 11 Apr 2021 08:00 PM (IST)

    कोलकाताच्या पावर प्लेमध्ये बिनबाद 50 धावा

    कोलकाताने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 50 धावा केल्या आहेत. कोलकाताची सलामी जोडी नितीश राणा आणि शुबमन गिलने अर्धशतकी सलामी भागीदारी केली आहे.

  • 11 Apr 2021 07:51 PM (IST)

    गिलचा शानदार सिक्स

    शुबमन गिलने सामन्यातील 5 व्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजनच्या बोलिंगवर 85 मीटर लांब सिक्स खेचला.

  • 11 Apr 2021 07:37 PM (IST)

    कोलकाता आणि नितीश राणाची चौकाराने सुरुवात

    कोलकाता नाईट रायडर्स आणि नितीश राणाने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात चौकाराने केली आहे.

  • 11 Apr 2021 07:32 PM (IST)

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे.  नितीश राणा-शुबमन गिल सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

  • 11 Apr 2021 07:26 PM (IST)

    हरभजनचे कोलकाताकडून पदार्पण

    हैदराबाद विरुद्धच्या या सामन्यातून अनुभवी फिरकीपटू हरभजन सिंह कोलकाताकडून पदार्पण करत आहे. याआधी हरभजनने मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केलं आहे.

  • 11 Apr 2021 07:18 PM (IST)

    कोलकाता नाइट राइडर्सचे अंतिम 11 खेळाडू

    इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), आंद्रे रसेल, शाकिब अल हसन, वरूण चक्रवर्ती, पॅट कमिन्स, हरभजन सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा.

  • 11 Apr 2021 07:15 PM (IST)

    सनरायजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन

    डेव्हिड वार्नर (कर्णधार), रिद्धिमान साहा, मनीष पांडे, जॉनी बेयरस्टो, विजय शंकर, मोहम्मद नबी, अब्दुल समद, राशिद खान, भुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा आणि टी. नटराजन.

  • 11 Apr 2021 07:05 PM (IST)

    हैदराबादने टॉस जिंकला 

    हैदराबादने टॉस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार डेव्हिड वॉर्नरने कोलकाताला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे.

  • 11 Apr 2021 06:37 PM (IST)

    कोण वरचढ कोण कमजोर?

    आयपीएलमध्ये दोन्ही संघ 19 वेळा एकमेकांसमोर भिडले आहेत. ज्यामध्ये केकेआर भारी राहिली आहे. कोलकात्याने 12 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने 7 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

  • 11 Apr 2021 06:36 PM (IST)

    हैदराबाद विरुद्ध कोलकाता आमनेसामने

    आयपीएलच्या 13 व्या मोसमातील तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. ही मॅच सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे.

Published On - Apr 11,2021 11:18 PM

Follow us
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?
अखेर गृहखातं कोणाकडे जाणार? फडणवीस की शिंदे? कोणतं खातं कुणाकडे असणार?.
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या...
उद्या लोकलने प्रवास करताय? कोणत्या मार्गावर मेगाब्लॉक? जाणून घ्या....
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?
'एकला चलो रे'... आगामी महापालिका निवडणुकीचे वारे अन् स्वबळाचे नारे?.