SRH vs LSG Playing XI IPL 2022: विजयासाठी हैदराबादच्या संघात बदल, लखनौ विजयी संघासोबतच उतरणार
आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) संघ सोमवारी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) भिडणार आहे.
मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) मध्ये के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्सचा (Lucknow Super Giants) संघ सोमवारी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादशी (Sunrisers Hyderabad) भिडणार आहे. या सामन्यात लखनौचा संघ उत्कंठावर्धक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मैदानात उतरत आहे. यापूर्वी त्यांना गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. दुसरीकडे, सनरायझर्सने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि त्यात राजस्थान रॉयल्सने त्यांचा पराभव केला होता. यावेळी हे दोन्ही संघ नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. या मोसमात या मैदानावर दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल. लखनौचा संघ विजयी कामगिरी कायम राखण्याचा प्रयत्न करेल, तर सनरायझर्स संघाला विजयाचे खाते उघडायचे आहे.
पहिल्या सामन्यात सनरायझर्ससाठी काहीही चांगले झाले नाही. ना संघाची फलंदाजी चालली ना गोलंदाजी. अशा परिस्थितीत त्यांना या दोन्ही क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचवेळी लखनौचा शेवटचा सामना उत्तम ठरला होता. पहिल्या सामन्यातही त्यांनी चांगली कामगिरी केली होती, पण अखेरच्या क्षणी त्यांनी सामना गमावला.
सनरायझर्स हैदराबाद संघात बदल करण्याची शक्यता
पहिल्या सामन्यात सनरायझर्सचा संघ पराभूत झाला असला तरी या संघाकडे दुर्लक्ष करणे कोणत्याही संघाला परवडणारे नाही. या संघाने आपली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन निवडली पाहिजे. लखनौविरुद्ध विल्यमसन काही बदल करू शकतो. डी. वाय. पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर फलंदाजांना मदत मिळते आणि त्याच वेळी ही खेळपट्टी फिरकीलाही मदत करते. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदरसह विल्यमसन आपल्या संघात आणखी एका फिरकी गोलंदाजाची भर घालू शकतो. अशा स्थितीत श्रेयस गोपालला संघात संधी मिळू शकते. तो संघात टी. नटराजन किंवा उमरान मलिका या दोघांपैकी एकाची जागा घेऊ शकतो.
विनिंग कॉम्बिनेशनसह लखनौचा संघ मैदानात उतरणार
चेन्नईविरुद्ध लखनौने दमदार कामगिरी केली होती. संघाच्या विजयात सर्व खेळाडूंनी मोलाचे योगदान दिले. अशा स्थितीत कर्णधार केएल राहुल त्याच संघासोबत जाऊ शकतो ज्यासोबत त्याने शेवटचा सामना जिंकला होता.
सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन
केन विल्यमसन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, रोमारिया शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक, श्रेयस गोपाल.
लखनौ सुपर जायंट्सची प्लेईंग इलेव्हन
केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, मनीष पांडे, दीपक हुडा, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, अँड्र्यू टाय, दुष्मंथा चमिरा, रवी बिश्नोई, आवेश खान.
इतर बातम्या