SRH vs MI IPL 2023 Highlights | मुंबईचा हैदराबादवर 14 धावांनी विजय, पलटणचा सलग तिसरा विजय

| Updated on: Apr 18, 2023 | 11:34 PM

SRH vs MI IPL 2023 Highlights In Marathi | आयपीएलच्या 16 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबाद टीमचा त्यांच्याच घरात 14 धावांनी पराभव केला आहे.

SRH vs MI IPL 2023 Highlights | मुंबईचा हैदराबादवर 14 धावांनी विजय, पलटणचा सलग तिसरा विजय

हैदराबाद | आयपीएल 16 व्या मोसमातील 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स टीमने सनरायजर्स हैदराबाद टीमवर 14 धावांनी विजय मिळवला आहे.  मुंबई इंडियन्सचा हा या मोसमातील सलग तिसरा विजय ठरला आहे.  मुंबईने हैदराबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. या सामन्याचं आयोजन हे राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं.  सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना होता. आतापर्यंत दोन्ही संघांनी खेळलेल्या 4 पैकी 2 सामन्यात विजय मिळवला होता. विशेष बाब म्हणजे दोन्ही संघांचा सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव झाला होती. तर त्यानंतर सलग तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे दोन्ही संघांना ही मॅच जिंकून विजयाची हॅटट्रिक पूर्ण करण्याची संधी होती. मात्र मुंबईने हैदराबादवर मात करत विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 18 Apr 2023 11:29 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | मुंबईची विजयाची हॅटट्रिक, हैदराबादवर 14 धावांनी विजय

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादला 14 धावांनी पराभूत करत मोसमातील सलग तिसरा विजय मिळवला आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिले होते. मात्र मुंबईच्या गोलंदाजांनी हैदराबादला 19.5 ओव्हरमध्ये 178 धावांवर ऑलआऊट केलं. मुंबईने या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थाननी झेप घेतली आहे.

  • 18 Apr 2023 11:02 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | मार्को जान्सेन आऊट, हैदराबादला सातवा धक्का

    हैदरबादने मार्को जान्सेन याच्या रुपात सातवी विकेट गमावली आहे. त्यामुळे आता मुंबईला विजयासाठी 3 विकेट्सची आवश्यकता आहे.

  • 18 Apr 2023 10:50 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | सनरायजर्स हैदराबादची सहावी विकेट

    सनरायजर्स हैदराबादने सहावी विकेट गमावली आहे. मयंक अग्रवाल 48 धावा करुन तंबूत परतला आहे.

  • 18 Apr 2023 10:44 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हेनरिच क्लासेन आऊट

    हैदराबादने पाचवी विकेट गमावली आहे. हेनरिच क्लासेन 16 बॉलमध्ये 36 धावांची वेगवान खेळी करुन माघारी परतला.

  • 18 Apr 2023 10:19 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हैदरबादला चौथा धक्का

    हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. कॅप्टन एडन मार्करम याच्यानंतर अभिषेक शर्मा आऊट झाला आहे. अभिषेक 1 रन करून आऊट झाला. त्याआधी कॅप्टन एडन मार्करमने 22 रन्स केल्या.

  • 18 Apr 2023 09:49 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हैदराबादची दुसरी विकेट

    हैदरबादने दुसरीविकेट गमावली आहे. राहुल त्रिपाठी 7 धावा करुन आऊट झाला आहे. जेसन बेहरनडॉर्फ यानेच त्रिपाठीला आऊट केलं.

  • 18 Apr 2023 09:38 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हैरी ब्रूक आऊट

    सनरायजर्स हैदराबादने पहिली विकेट गमावली आहे. हॅरी ब्रूक 9 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 18 Apr 2023 09:32 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | मयंक अग्रवाल-हॅरी ब्रूक सलामी जोडी मैदानात

    हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. मयंक अग्रवाल-हॅरी ब्रूक ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. मुंबईने हैदराबादला विजयासाठी 193 धावांचं आव्हान दिलं आहे.

  • 18 Apr 2023 09:19 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हैदराबादला विजयासाठी 193 रन्सचं टार्गेट

    मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदाराबादला विजयासाठी 193 धावांचे आव्हान दिलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 192 धावा केल्या. मुंबईकडून कॅमरुन ग्रीन याने सर्वाधिक नाबाद 64 धावांची खेळी केली. इशान किशन याने 38 रन्सचं योगदान दिलं. टिळक वर्मा याने 17 बॉलमध्ये 2 फोर आणि सिक्सच्या मदतीने 37 रन्सची वादळी खेळी केली. कॅप्टन रोहित शर्मा 28 धावा करुन मैदानाबाहेर पडल. टीम डेव्हिड याने 16 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादव याने 7 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. सूर्याचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजाना चांगली सुरुवात मिळाली. मात्र कॅमरुन ग्रीन याचा अपवाद वगळता एकाही बॅट्समनला मोठी खेळी साकारता आली नाही. हैदराबादकडून मार्को जान्सेन याने 2 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

  • 18 Apr 2023 08:56 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | टिळक वर्मा आऊट

    मुंबईने चौथी विकेट गमावली आहे. इशान आणि सुूर्यकुमार यादव आऊट झाल्यानंतर मुंबई इंडियन्स अडचणीत सापडली होती. मात्र  त्यानंतर टिळक वर्मा आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर टिळक 37 धावा करुन आऊट झाला.

  • 18 Apr 2023 08:29 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | इशान पाठोपाठ सूर्या आऊट, मुंबईला एकाच ओव्हरमध्ये 2 झटके

    मुंबई इंडियन्सला मोठा झटका लागला आहे. इशान किशन पाठोपाठ सूर्यकुमार यादवही आऊट झाला आहे.  इशान आणि सूर्या हे दोघेही 12 व्या ओव्हमध्ये आऊट झाले.

  • 18 Apr 2023 08:27 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | इशान किशन आऊट

    मुंबई इंडियन्सने दुसरी विकेट गमावली आहे. इशान किशन 38 धावा करुन आऊट झाला आहे. इशानने 31 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 38 धावांची खेळी केली.

  • 18 Apr 2023 07:52 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | रोहित शर्मा आऊट, मुंबईला पहिला धक्का

    मुंबई इंडियन्सने चांगल्या सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे.  हैदराबादच्या टी नटराजन याने मुंबई इंडियन्सचा कॅप्टन रोहित शर्मा याला 28 धावांवर आऊट केलं.

  • 18 Apr 2023 07:49 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | मुंबईची झोकात सुरुवात

    रोहित शर्मा आणि इशान किशन या सलामी जोडीने मुंबईला आश्वासक आणि अपेक्षित सुरुवात दिली आहे. या दोघांनी 4 ओव्हरमध्ये 33 धावा केल्या आहेत.

  • 18 Apr 2023 07:30 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात

    मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कॅप्टन रोहित शर्मा आणि इशान किशन ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

  • 18 Apr 2023 07:14 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन

    मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, अर्जुन तेंडुलकर, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ.

  • 18 Apr 2023 07:13 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन

    सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग इलेव्हन | एडम मार्करम (कॅप्टन), मयंक अग्रवाल, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), राहूल त्रिपाठी, हॅरी ब्रूक, अभिषेक शर्मा, भुवनेश्वर कुमार, मयांक मार्कंडे, मार्को जानसेन, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर.

  • 18 Apr 2023 07:02 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हैदराबाद विन टॉस, मुंबई इंडियन्सला बॅटिंगचं आमंत्रण

    सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला आहे. कॅप्टन एडन मार्करम याने मुंबई इंडियन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. त्यामुळे मुंबई हैदराबादला विजयासाठी किती धावांचं आव्हान देणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

  • 18 Apr 2023 06:02 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हेड टु हेड रेकॉर्ड

    सनरायजर्स हैदराबाद-मुंबई इंडियन्स दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 19 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. मुंबईने 19 पैकी 10 वेळा विजय मिळवला आहे. तर हैदराबादने मुंबईवर 9 सामन्यात मात केली आहे. गेल्या 5 सामन्यांपैकी मुंबईने 3 वेळा विजय मिळवला. तर हैदराबादने 2 सामन्यात बाजी मारली.

  • 18 Apr 2023 05:59 PM (IST)

    SRH vs MI IPL 2023 Live Score | हैदराबाद विरुद्ध मुंबई यांच्यात लढत

    आयपीएल 16 व्या मोसमात आज 18 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.  या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

Published On - Apr 18,2023 5:57 PM

Follow us
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.