Asia Cup 2023 | आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट संघ जाहीर, 4 खेळाडू दुखापतीमुळे ‘आऊट’

Sri Lanka Cricket Squad For Asia Cup 2023 | आशिया कप 2023 स्पर्धेसाठी श्रीलंका क्रिकेट टीमची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसी आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सोशल मीडिया अकाउंटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.

Asia Cup 2023 | आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट संघ जाहीर, 4 खेळाडू दुखापतीमुळे 'आऊट'
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 6:15 PM

कोलंबो | आशिया कप 2023 साठी अखेर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने स्पर्धेच्या काही तासांआधी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या 15 सदस्यीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही दासुन शनाका याच्याकडे आहे. तर कुसल मेंडिस उपकर्णधार असणार आहे. तर वाईट बातमी अशी की टीममधून दुखापतीमुळे 4 खेळाडूंना बाहेर बसावं लागणार आहे. दुखापतीमुळे या चौघांची निवड करता आली नाही.

आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट संघ जाहीर

हे सुद्धा वाचा

दासुन शनाका याने आपल्याच नेतृत्वात गेल्या वर्षी 2022 मध्ये श्रीलंकेला आशिया कप जिंकून दिला होता. त्यात आता श्रीलंकेतच आशिया कपमधील 13 पैकी 9 सामने होणार आहेत. त्यामुळे श्रीलंकेला होम एडव्हानटेज असणार आहे. यामुळे आता दासुन या आशिया कपमध्ये कॅप्टन म्हणून कशी कामगिरी करतो, याकडेही श्रीलंका क्रिकेट बोर्ड आणि टीम मॅनेजमेंटचं लक्ष असणार आहे.

4 खेळाडूंची दुखापतीमुळे विकेट

एका बाजूला आशिया कपमधील 9 सामने श्रीलंकेत आहेत. तर दुसऱ्या बाजूला 4 खेळाडू हे दुखापतीच्या कचाट्यात सापडले आहेत. या चौघांमध्ये वानिंदु हसरंगा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका आणि लाहिरु कुमारा या चौघांचा समावेश आहे. या चौघांना दुखापतीमुळे टीममध्ये संधी देण्यात आली नाही. मात्र कुशल मेंडीस आणि धनंजय डी सिल्वा यांना कायम ठेवण्यात आलंय.

श्रीलंका बी ग्रुपमध्ये

दरम्यान आशिया कपमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि नेपाळ असे 6 संघ खेळणार आहेत. टीम इंडिया, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश बी ग्रुपमध्ये आहेत. त्यामुळे श्रीलंकेचा साखळी फेरीत बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्याशी सामना होणार आहे.

आशिया कपसाठी श्रीलंका क्रिकेट टीम | दासुन शनाका (कॅप्टन), कुसल मेंडिस (उपकर्णधार), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल जेनिथ परेरा, चरिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, महेश थिक्षाना, दुनिथ वेललागे, मथीशा पाथिराना, कसून राजिथा, दुशन हेमंथा, बिनुरा फर्नांडो आणि प्रमोद मधुशन.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.