SL vs WI : वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा वेस्ट इंडिजला दणका, 5 विकेट राखून मिळवला विजय

टी20 मालिका खिशात घातल्यानंतर वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेने वेस्ट इंडिजला दणका दिला आहे. पावसामुळे सामना डकवर्थ लुईस नियमानुसार खेळवला गेला. या सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली.

SL vs WI : वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेचा वेस्ट इंडिजला दणका, 5 विकेट राखून मिळवला विजय
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 11:00 PM

श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामन्यात श्रीलंकेने बाजी मारली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र वारंवार पावसाच्या व्यत्ययामुळे या सामन्यात खंड पडला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 38.3 षटकात 4 गडी गमवून 185 धावा केल्या. डकवर्थ लुईस नियमानुसार श्रीलंकेला 232 धावांचं आव्हान 37 षटकात गाठायचं होतं. मग काय श्रीलंकेने प्रशिक्षक सनथ जयसूर्याला साजेशी सुरुवात करून आक्रमक फटकेबाजी करत संघाला विजयाच्या जवळ आणून सोडलं. श्रीलंकेने 5 गडी गमवून 31.5 षटकात हे आव्हान गाठलं. अविष्का फर्नांडोच्या रुपाने पहिली विकेट दुसऱ्या षटकात अवघ्या 6 धावांवर पडली. त्यानंतर आलेला कुसल मेंडिस काही खास करू शकला नाही. 8 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. तर सदीरा समरविक्रमचा डाव अवघ्या 18 धावांवर आटोपला. मात्र निशान मधुशंका आणि चरिथ असलंका यांनी चांगली खेळी केली. त्यांच्या खेळीमुळे श्रीलंकेचा विजय सोपा झाला. श्रीलंकेकडून निशान मधुशंकाने 69, तर चरीथ असलंकाने 77 धावांची खेळी केली.

श्रीलंकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्धची 3 सामन्यांची टी20 मालिका 2-1 ने खिशात घातली होती. आता वनडे मालिकेतील पहिल्या सामना जिंकून श्रीलंकेने पकड मिळवली आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजवर मालिकेत कमबॅकच दडपण असणार आहे. दुसरा काहीही करून वेस्ट इंडिजला जिंकावा लागेल अन्यथा ही मालिका श्रीलंकाच्या पारड्यात जाईल. दुसरा वनडे सामना 23 ऑक्टोबरला होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): निशान मदुष्का, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिंदू मेंडिस, चरिथ असालंका (कर्णधार), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, ड्युनिथ वेललागे, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): ब्रँडन किंग, ॲलिक अथनाझे, शाई होप (विकेटकीपर/कर्णधार), कीसी कार्टी, रोस्टन चेस, शेरफेन रदरफोर्ड, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोटी, हेडन वॉल्श, जेडेन सील्स, अल्झारी जोसेफ

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....