ENG vs SL: 8 डावात 3 शतकं आणि 3 अर्धशतकं, सरासरीला तोड नाही, कोण आहे तो?

England vs Sri Lanka 2nd Test: श्रीलंका क्रिकेट टीमला अव्वल दर्जाचा ऑलराउंडर मिळाला आहे. या अष्टपैलूने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील पहिल्याच 8 डावात दमदार कामगिरी केली आहे.

ENG vs SL: 8 डावात 3 शतकं आणि 3 अर्धशतकं, सरासरीला तोड नाही, कोण आहे तो?
Kamindu Mendis sri lankaImage Credit source: Englands Barmy Army X Account
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 12:40 AM

श्रीलंकेचा स्टार ऑलराउंडर कामिंदु मेंडीस याने त्याच्या कसोटी कारकीर्दीच्या शानदार सुरुवात केली आहे. कामिंदुने अवघ्या काही डावातच शानदार कामगिरी केली आहे. कामिंदुने यासह क्रिकेट विश्वाला त्याच्या कामगिरीची दखल घेण्यास भाग पाडलं आहे. तसेच कामिंदुने आपला ठसाही उमटवला आहे. कामिंदुने 2022 साली कसोटी पदार्पण केलं. मात्र कामिंदुने 2024 वर्षात आपली छाप सोडली आहे. कामिंदूने इंग्लंड विरूद्धच्या लॉर्ड्स येथे खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेची लाज राखली. श्रीलंकेचा पहिला डाव हा 196 धावांवर आटोपला. एका बाजूला इतर सहकारी अपयशी ठरत असताना कामिंदुने एक बाजू लावून धरली आणि या डावात सर्वाधिक 74 धावा केल्या.

कामिंदु मेंडीस दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात सातव्या स्थानी बॅटिंगसाठी आला. कामिंदुने 74 धावांची खेळी केली. कामिंदुच्या कसोटी कारकीर्दीतील हे तिसरं अर्धशतक ठरलं. मेंडीसने आतापर्यंत एकूण 8 डावांमध्ये बॅटिंग केली आहे. मेंडीसने त्यात 3 अर्धशतकं आणि 3 शतकं झळकावली आहेत.मेंडीसने इंग्लंड विरूद्धच्या सुरु असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत 3 डावात 1 शतक आणि 3 अर्धशतकं केली आहेत. मेंडीसने पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावात 113 धावांची शतकी खेळी केली होती.

कसोटी क्रिकेटकमध्ये सर्वाधिक सरासरीने धावांचा विक्रम हा दिग्गज डॉन ब्रॅडमॅन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमॅन याने त्यांच्या करिअरमध्ये 99.94 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर कामिंदु सरासरीच्या बाबतीत 102 पर्यंत जाऊन पोहचला होता. मात्र दुसऱ्या डावात कामिंदु 74 धावांवर आऊट होताच सरासरीने 89.57 इतकी झाली. मात्र कामिंदु ज्या पद्धतीने आतापर्यंत खेळतोय, तसाच तो पुढे खेळत राहिला, तर तो सर्वोत्तम सरासरीने धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक ठरेल.

कामिंदुच्या गेल्या 8 डावातील धावा

कामिंदु मेंडीसची कसोटी कारकीर्द

दरम्यान कामिंदुने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमधील 8 डावांमध्ये 89.57 च्या सरासरीने 627 धावा केल्या आहेत. कामिंदुने याच सरासरीने धावा केल्या, तर त्याला डॉन ब्रॅडमॅन याच्या जवळ येण्याची संधी आहे. कामिंदुने 9 एकदिवसीय सामन्यात 190 तर 16 टी 20i मॅचमध्ये 280 रन्स केल्या आहेत.

...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.