Kusal Mendis विराटच्या 49 व्या एकदिवसीय शतकाबाबत काय म्हणाला?
Kusal Mendis On Virart Kohli | विराट कोहली याने सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक एकदिवसीय शतकांच्या विश्न विक्रमाची बरोबरी केली. त्यानंतर विराटचं अभिनंदन होतंय.मात्र कुसल मेंडीस भलतंच काही बोलून गेलाय.
कोलकाता | टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका टीमवर 243 धावांच्या फरकाने मात करत वर्ल्ड कप 2023 मधील सलग आठवा विजय नोंदवला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेल्या 327 धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिका 83 धावांवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर त्याआधी विराट कोहली याने नाबाद 101 धावांची शतकी खेळी केली. विराटने या 49 व्या एकदिवसीय शतकासह सचिनच्या सर्वाधिक शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटचं त्यानंतर सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
एका बाजूला विराटचं जगभरातून कौतुक होतंय. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकाचा कर्णधार कुसल मेंडीस याने विराटला शुभेच्छा देण्यास नकार दिलाय. त्याला मी शुभेच्छा काय देऊ, असं कुसलने म्हटलंय. कुसलने विराटबाबत केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झालंय. कुसलच्या या विधानामुळे भारतीय आणि विराट कोहली याचे चाहते संतप्त झाले आहेत. एका कॅप्टनला असं बोलणं शोभत नाही, अशा शब्दात नेटकऱ्यांनी कुसलवर टीकेची झोड उठवली आहे.
नक्की काय झालं?
वर्ल्ड कपमधील 38 वा सामना हा सोमवारी 6 नोव्हेंबरला होणार आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला कुसल मेंडीस याने पत्रकार परिषदेला उपस्थित राहून अनेक प्रश्नांची उत्तरं दिलं. या दरम्यान कुसलला एका पत्रकाराने विराटबाबत प्रश्न केला. “विराटला 49 व्या शतकाबाबत शुभेच्छा देणार का?”, असा प्रश्न पत्रकाराने कुसलला केला. यावर कुसल म्हणाला की “मी त्याला का शुभेच्छा देऊ”.
दरम्यान श्रीलंकासाठी बांगलादेश विरुद्धचा सामना हा करो या मरो असा आहे. श्रीलंकेला वर्ल्ड कपमधील जर तरचं आव्हान कायम ठेवायचं असेल, तर बांगलादेश विरुद्ध कोणत्याही परिस्थितीत जिंकावं लागणार आहे. बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होणार आहे.
कुसल मेंडीस काय म्हणाला?
Indian Journalist asks Kusal Mendis that “Virat just scored 49th ton, would you like to congratulate him.”
On this Kusal Mendis replied “Why would I like to congratulate him ?”
These self obsessed Indians 🤦🏻♂️🤦🏻♂️#INDvsSA #INDvSA #CWC23 #BANvSRI pic.twitter.com/NlV59TTItk
— Ahmad (@AhmadSpeakss) November 5, 2023
बांगलादेश क्रिकेट टीम | शकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तांझिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, नसुम अहमद, महेदी हसन, हसन महमूद आणि तंजीम हसन साकिब.
श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, सदीरा समरविक्रमा, चरित असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, दुष्मंथा चमीरा, महेश तीक्षना, कसून रजिथा, दिलशान मदुशांका, धनंजया डी सिल्वा, कुसल परेरा, चमिका करुणारत्ने, लहीरु कुमारा आणि दुनिथ वेल्लालागे.