SL vs AFG 3rd T20I | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान आमनेसामने, तिसरा सामना केव्हा?
Sri Lanka vs Afghanistan 3rd T20I Live Streaming | श्रीलंका क्रिकेट टीमने अफगाणिस्तानवर संपूर्ण दौऱ्यात पकड मिळवली. मात्र आता अफगाणिस्तान दौऱ्याचा शेवट गोड करण्यासाठी तिसऱ्या सामन्यात आणखी तयारीने मैदानात उतरणार आहे.
दांबुला | श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सध्या टी 20 मालिका खेळत आहेत. श्रीलंका या 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. श्रीलंकेने ही मालिका जिंकली आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी तिसरा सामना हा औपचारिकता आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानसाठी हा प्रतिष्ठेचा सामना आहे. कारण अफगाणिस्तानला श्रीलंका दौऱ्यात आतापर्यंत एकही सामना जिंकता आलेला नाही. उभयसंघात टी 20 मालिकेआधी वनडे सीरिज आणि एकमेव कसोटी सामना पार पडला. हे सर्व सामने श्रीलंकेने जिंकले आहेत.
त्यामुळे अफगाणिनस्तानसाठी अखेरचा आणि तिसरा टी 20 सामना हा फार महत्त्वाचा आहे. वानिंदू हसरंगा हा श्रीलंकेचं नेतृत्वं करणार आहे. तर इब्राहीम झद्रान याच्याकडे अफगाणिस्तानची धुरा असणार आहे. दरम्यान हा तिसरा सामना कधी आणि कुठे होणार हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना केव्हा?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना रंगीरी दांबुला क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसरा टी 20 सामना किती वाजता सुरु होणार?
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान तिसऱ्या टी 20 सामन्याला भारतीय वेळनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवाता होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
अफगाणिस्तान टीम | इब्राहिम झदरन (कर्णधार), हजरतुल्ला झझाई, रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), गुलबदिन नायब, अजमातुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, करीम जनात, नजीबुल्ला झदरन, नूर अहमद, नवीन उल हक, फजलहक फारूकी, कैस अहमद, फरीद अहमद मलिक, शराफुद्दीन अश्रफ, वफादर मोमंद आणि मोहम्मद इशाक.
श्रीलंका टीम | वानिंदू हसरंगा (कर्णधार), पाथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, महेश तीक्षना, बिनुरा फर्नांडो, मथीशा पाथिराना, कामिंदू मेंडिस, अकिला धनंजया, कुसल परेरा, दिलशान मदुशंका आणि नुवान तुषारा.