Sri Lanka vs England, 2nd Test | जो रुटची विक्रमाला गवसणी, 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

जो रूटने (Joe Root) श्रीलंकाविरोधातील दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात 186 धावांची शतकी खेळी केली.

Sri Lanka vs England, 2nd Test  | जो रुटची विक्रमाला गवसणी, 16 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
इंग्लंडचा कर्णधार जो रुट
Follow us
| Updated on: Jan 25, 2021 | 2:42 PM

कोलंबो : इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट ( England Captain Joe Root) सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. तो श्रीलंकेविरोधातील कसोटी मालिकेत England Tour Sri Lanka 2021) शानदार कामगिरी करत आहे. रुटने श्रीलंका विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विक्रमाला गवसणी घातली आहे. रुटने शतक ठोकत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. ते रेकॉर्ड्स नक्की काय आहेत, हे आपण पाहुयात. (sri lanka vs england 2nd test captain joe root record break)

शतक एक विक्रम अनेक

रुटने श्रीलंकाविरोधातील दुसऱ्या सामन्यामधील पहिल्या डावात 186 धावांची शतकी खेळी केली. रुटच्या कसोटी कारकिर्दीतील हे 19 वे शतक ठरलं. तर या मालिकेतील दुसरं शतक ठरलं. यासह रुट लंकाविरोधात इंग्लंडकडून सर्वाधिक 4 शतक लगावणारा फंलदाज ठरला.

सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा चौथा फलंदाज

रुटने 186 धावांच्या खेळीसह ज्योफ्री बॉयकॉट, केविन पीटरसन आणि डेव्हिड गॉवर यांना पछाडत सर्वाधिक धावांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. म्हणजेच रुट इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत टॉप 3 मध्ये अनुक्रमे एलिस्टर कुक, ग्रॅहम गूच आणि एलेक स्टीवर्ट यांचा समावेश आहे.

सलग 2 सामन्यांमध्ये 150 पेक्षा अधिक धावा

रुटने याशिवाय 16 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. रुट इंग्लंडकडून तब्बल 16 वर्षानंतर कसोटीमध्ये सलग 2 सामन्यांमध्ये 150 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

रुटचा तगडा फॉर्म टीम इंडियासाठी धोकादायक ठरू शकतो. श्रीलंका दौरा आटोपल्यानंतर इंग्लंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होणार आहे. यामुळे टीम इंडियासमोर पर्यायाने गोलंदाजांसमोर रुटला स्वसतात बाद करण्याचे आव्हान असणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या टेस्ट सीरिज खेळण्यात येणार आहे.

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना – चेन्नई – 5 ते 9 फेब्रुवारी दुसरा सामना – चेन्नई – 13 ते 17 फेब्रुवारी तिसरा सामना – अहमदाबाद – 24 ते 28 फेब्रुवारी चौथा सामना – अहमदाबाद – 4 ते 8 मार्च

पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा, शुभमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रिद्धीमान साहा, हार्दिक पंड्या, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल.

टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 टेस्टसाठी इंग्लंड टीम : जो रूट (कप्तान), रोरी बर्न्स, डॉम सिबले, बेन स्टोक्स, जॉस बटलर, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जॅक क्रॉले, ओली स्टोन, ख्रिस वोक्स, बेन फोक्स, जेम्स एंडरसन, डॉम बेस, डॅन लॉरेन्स, स्टुअर्ट ब्रॉड आणि जैक लीच.

संबंधित बातम्या :

Ind vs Eng 2021 | टीम इंडियाविरोधातील कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचे स्टार खेळाडू भारतात दाखल

#INDvsENG | टीम इंडियाविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी इंग्लंड संघाची घोषणा

England Tour India | इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणे की विराट कोहली, कर्णधार कोण?

(sri lanka vs england 2nd test captain joe root record break)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.