Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs IND 2nd Odi Live Streaming: पहिला सामना टाय, आता दुसरी वनडे मॅच केव्हा?

Sri Lanka vs India 2nd Odi Live Streaming: श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या सर्वकाही माहिती.

SL vs IND 2nd Odi Live Streaming: पहिला सामना टाय, आता दुसरी वनडे मॅच केव्हा?
kusal mendis and rohit sharma
Follow us
| Updated on: Aug 03, 2024 | 5:14 PM

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना हा बरोबरीत सुटला. श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 231 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 230 वर ऑलआऊट झाली. त्यामुळे पहिली वनडे मॅच ही टाय झाली. आयसीसीच्या नियमांनुसार एकदिवसीय द्विपक्षीय मालिकेतील सामना बरोबरीत सुटल्यानंतर सुपर ओव्हर होत नाही. त्यामुळे पहिला सामना निकाली निघू शकला नाही. त्यानंतर आता दोन्ही संघांना दुसऱ्या सामन्याची प्रतिक्षा आहे. दोन्ही संघांचा दुसऱ्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे. हा सामना कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.

चरिथ असालंका श्रीलंकेचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा आहे. दोन्ही कर्णधारांचा आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देत मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नांमध्ये कोणला यश येतं हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना कधी?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना रविवारी 4 ऑगस्टला होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना कुठे?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना हा आर प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो येथे होणार आहे.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सुरुवात होईल. तर 2 वाजता टॉस होईल.

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा एकदिवसीय सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तसेच डीडी स्पोर्ट्सवरही (फ्री डीश) सामना पाहायला मिळेल.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, रियान पराग आणि हर्षित राणा.

श्रीलंका टीम : चरिथ असालंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, दुनिथ वेललागे, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, असिथा फर्नांडो, मोहम्मद शिराझ, चमिका करुणा, चमिका करुणा, मोहम्मद शिराज मेंडिस, निशान मधुष्का आणि एशान मलिंगा.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.